मुंबई, 24 जानेवारी : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या तिरंगी टी-20 मालिकेत भारताने सलग दुसरा विजय आपल्या नावावर केला आहे. सोमवारी वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा सामना भारताने 56 धावांनी जिंकला असून या सामन्यात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना या दोघी विजयाच्या शिल्पकार ठरल्या. या दोघींनी 115 धावांची केलेली पार्टनरशीप संघाच्या विजयात मोलाची ठरली. वेस्टइंडीज विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करून भारताने 167 धावा केल्या आणि वेस्टइंडीजला 168 धावांचे आव्हान दिले. हरमनप्रीतने 35 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या. तर स्मृती मानधनाने 10 चौकार आणि 1 षटकार लगावत आपले अर्धशतक केले. यापूर्वी झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. वेस्टइंडीज विरुद्धच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 2 बाद 60 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर पुढच्या 10 षटकात एकही विकेट न गमावता 107 धावा केल्या. हे ही वाचा : मोहम्मद शमीला न्यायालयाचा दणका! विभक्त पत्नीला दरमहा द्यावे लागणार लाखो रुपये
भारताने दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूज आणि शेमेन कॅम्पबेल यांनी मोठी भागीदारी केली. दोघांमध्ये 71 धावांची भागीदारी झाली. मात्र भारताच्या तगड्या गोलंदाजीसमोर विंडीजला गुढघे टेकावेच लागले.
वेस्ट इंडिजचा संघ 20 ओव्हरमध्ये केवळ 111 धावाच करू शकल्या आणि अशापद्धतीने भारताने 56 धावांनी सामना जिंकला.