मुंबई, 24 जानेवारी : भारतीय संघातील गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अडचणीत सापडला आहे. शमीची पत्नी हसीन जहाँ हिने काही वर्षांपूर्वी त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप करत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँने घटस्फोट घेतला. आता कोलकाता फास्ट ट्रॅक कोर्टाने शमिला त्याच्या पत्नीला लाखो रुपयांची पोटगी देण्याचा निर्णय देऊन दणका दिला आहे.
शमीची विभक्त पत्नी हसीन जहाँ हिने 2018 साली शमी कडून दरमहा 10 लाख रुपयांची पोटगी मिळावी अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती. परंतु हसीन हिच्या याचिकेविरुद्ध शमीच्या वकिलांनी जोरदार बाजू मांडली. त्यानंतर दोन्ही पक्षांचा निर्णय ऐकून न्यायालयाने निकाल दिला आहे.
मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ हे दोघे 2014 रोजी लग्नबंधनात अडकले. शमीची पत्नी हसीन जहाँ ही एक अभिनेत्री आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर शमी आपल्यावर हिंसाचार करीत असल्याचा आरोप हसीनने केला होता. त्यानंतर बराचकाळ शमी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे व्यथित होता. परंतु आता तो पुन्हा एकदा फॉर्मात आला आहे. सध्या शमी न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सामन्यातही आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news