मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सरकारला अंधारात ठेऊन पाकमध्ये पोहचला भारतीय संघ, VIRAL फोटोनं उडवली सगळ्यांची झोप

सरकारला अंधारात ठेऊन पाकमध्ये पोहचला भारतीय संघ, VIRAL फोटोनं उडवली सगळ्यांची झोप

केंद्र सरकारला अंधारात ठेऊन पाकमध्ये मालिका खेळण्यासाठी दाखल झाला भारतीय संघ.

केंद्र सरकारला अंधारात ठेऊन पाकमध्ये मालिका खेळण्यासाठी दाखल झाला भारतीय संघ.

केंद्र सरकारला अंधारात ठेऊन पाकमध्ये मालिका खेळण्यासाठी दाखल झाला भारतीय संघ.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : विश्व कबड्डी चॅम्पियनसाठी (सर्किल स्टाईल) भारतीय संघ पाकिस्तानमध्ये (Pakistan) दाखल झाला आहे. मुख्य म्हणजे भारतीय संघ पाकमध्ये दाखल झाल्याबद्दल क्रीडा मंत्री किंवा राष्ट्रीय महासंघ यांपैकी कोणालाही माहिती नव्हती किंवा संघाला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र भारतीय संघ परस्पर या चॅम्पियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी शनिवारी वाघा बॉर्डरकडून लाहोरमध्ये पोहचला. पहिल्यांदाच कबड्डी चॅम्पियनशीपचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जात आहे.

दरम्यान, भारतीय संघाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांची झोप उडली. या स्पर्धेचा पहिला सामना आज लाहोरच्या पंजाब फुटबॉल मैदानावर आजपासून होत आहे. याआधी काही सामने फैसलाबाद आणि गुजरातमध्ये खेळले गेले होते.

वाचा-भारतीय खेळाडूंना मारण्यासाठी बॅट घेऊन मैदानात आला होता बांगलादेशी खेळाडू आणि...

वाचा-प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यशस्वीसाठी ठरणार लकी? युवीसारखा होणार सुपरस्टार

सरकारने नाही दिली परवानगी

क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारकडून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नव्हती. पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी नसताना खेळाडू कसे पोहचले, याची चौकशीही करण्यात येईल असेही सुत्रांनी सांगितले. क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, क्रीडा मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणे अनिवार्य असलेल्या कोणत्याही संघास परवानगी दिली नाही.

वाचा-बांगलादेशी खेळाडूंचे घाणेरडे वर्तन! टीम इंडियाला कॅमेरासमोर घातल्या शिव्या

वाचा-बुमराहला टक्कर देतोय 15 वर्षांचा किवी गोलंदाज! VIDEO VIRAL

भारतीय अ‍ॅमेच्योर कबड्डी फेडरेशन (AKFI) प्रशासक न्यायाधीश (निवृत्त) एसपी गर्ग यांनीही सांगितले की राष्ट्रीय संघटनेने कोणत्याही संघास मान्यता दिली नाही. ते म्हणाले की कुठल्याही कबड्डी संघाला पाकिस्तानमध्ये जाण्याची माहिती नाही. एकेएफआयने कोणत्याही संघाला पाकिस्तानात जाऊन तेथे कबड्डी सामने खेळण्याची परवानगी दिली नव्हती. याविषयी माहिती मागितली गेली तेव्हाच आम्हाला माहिती मिळाली, असे सूत्रांनी सांगितले. एकेएफआय अशा क्रियांना समर्थन देत नाही, असे करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

वाचा-VIDEO : नेपाळच्या 15 वर्षीय क्रिकेटरचं अर्धशतक, सचिनलाही टाकलं पिछाडीवर

पाकिस्तानात भारतीय पक्षाचे भव्य स्वागत

परराष्ट्र स्पर्धांमध्ये भाग घेण्याच्या प्रक्रियेत, राष्ट्रीय फेडरेशन क्रीडा मंत्रालयाला (Sports Ministry) माहिती देते जे सरकार या संघासाठी खर्च करीत आहे की नाही याकडे दुर्लक्ष करून, राजकीय मंजुरीसाठी परराष्ट्र मंत्रालयाला आणि गृह मंत्रालयाला सुरक्षा मंजुरीसाठी लिहिते. त्याच वेळी पाकिस्तान पंजाबचे क्रीडामंत्री राय तैमूर खान भट्टी यांनी लाहोरमधील हॉटेलमध्ये भारतीय पथकाचे स्वागत केले. पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर पाकिस्तान कबड्डी फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून भारतीय खेळाडूंचे स्वागत केले, त्यानंतर सुरक्षेखाली त्यांना लाहोरमधील हॉटेलमध्ये नेण्यात आले. वर्ल्ड कबड्डी चॅम्पियनशिपचे शेवटचे पहिल्या 6 स्पर्धा 2010 ते 2016 या काळात भारतात पार पडले. 2010, 2012, 2013 आणि 2014मध्ये भारताने पाकिस्तानला नमवले. या स्पर्धेत विजयी संघाला 1 कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला 75 लाख रुपये मिळतील.

First published:

Tags: India vs pakistan, Kabaddi