VIDEO : नेपाळच्या 15 वर्षीय क्रिकेटरचं अर्धशतक, इतिहास रचून मास्टर-ब्लास्टरलाही टाकलं मागे

VIDEO : नेपाळच्या 15 वर्षीय क्रिकेटरचं अर्धशतक, इतिहास रचून मास्टर-ब्लास्टरलाही टाकलं मागे

15 वर्ष 340 दिवस वय असलेल्या कुशल मल्ला आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

  • Share this:

काठमांडू, 09 फेब्रुवारी: नेपाळचा 15 वर्षाचा क्रिकेटर कुशल मल्ला (Kushal Malla)ने ICC men's cricket world cup league 2 मध्ये अर्धशतक ठोकत इतिहास रचला आहे. अमेरिकेविरुद्धच्या (USA) सामन्यात या युवा खेळाडूने चमकदार कामगिरी केली आहे. कुशल मल्लाने 49 चेंडूत 50 धावा करत हा इतिहास रचला आहे. 15 वर्ष 340 दिवस वय असलेल्या कुशल मल्ला आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

डेब्यू सामन्यातच रचला इतिहास

अमेरिका (USA) विरुद्धच्या या सामन्यात मल्लाने डेब्यू केला आहे. डेब्यू सामन्यातच त्याने अर्धशतक झळकवत हमवतन रोहित पॉडेलचा (Rohit Paudel) विक्रम मोडीत काढला. पॉडेलने गेल्या वर्षी UAE विरुद्ध अर्धशतकी खेळी करत विक्रम रचला होता. 16 वर्ष 146 दिवस वयात हा विक्रम त्याने प्रस्थापित केला होता. आता हा विक्रम कुशल मल्लाने मोडीत काढला आहे.

(हेही वाचा : VIDEO : ऑस्ट्रेलियाचं चॅलेंज स्वीकारत मास्टर-ब्लास्टर उतरला मैदानात)

मास्टर-ब्लास्टरलाही सोडलं पिछाडीवर

कुशलने फक्त रोहित पॉडेलच नाही तर, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) मागे टाकलं आहे. सचिन तेंडुलकरने 17व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं तसेच, पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर शाहिद आफ्रीदीलाही (Shahid Afridi) त्याने मागे सोडलं आहे. आफ्रीदीने 16 वर्ष 217 दिवस वयात अर्धशतक ठोकलं होतं. या खेळीला आफ्रीदीने शतकातही रुपांतर केलं होतं.

(हेही वाचा : मालिकेतील पराभव जिव्हारी लागला? विराट कोहलीचं धक्कादायक विधान)

अर्धशतकी खेळीनंतर बॅट नाही उंचावली!

नाणेफेक जिंकत अमेरिकेने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या गोलंदाजांनी नेपाळला 49.2 ओव्हरमध्ये गुंडाळलं. यावेळी नेपाळ 192 धावाच करू शकली. 20 ओव्हरमध्ये 49 धावा करत नेपाळचे 5 गडी तंबूत परतले होते. यानंतर संकटात सापडलेल्या आपल्या संघाला कुशलने अर्धशतकी खेळीने सांभाळलं. मल्लाच्या खेळीदरम्यान, उपस्थितांनी त्याला टाळ्यांची साथ दिली. यावेळी मल्लाने अर्धशतक झळकल्यावर आपली बॅटही उंचावली नाही. मल्लासोबत भंडारीने 62 चेंडूत अर्धशतकी खेळी केली.

गोलंदाजीमध्येही चमकदार कामगिरी

कुशल मल्लाने फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीमध्येही चमकदार कामगिरी केली. मल्लाने अमेरिकाच्या 37 वर्षीय हचिसनला माघारी धाडलं. नेपाळने या विजयासोबत इतिहास रचला आहे. नेपाळचा वनडे क्रिकेटमधला हा पहिला विजय होता. ज्यामध्ये त्यांनी 35 धावांनी विजय मिळवला.

First published: February 9, 2020, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading