VIDEO : भारतीय खेळाडूंना मारण्यासाठी बॅट घेऊन मैदानात आला होता बांगलादेशी खेळाडू आणि...

VIDEO : भारतीय खेळाडूंना मारण्यासाठी बॅट घेऊन मैदानात आला होता बांगलादेशी खेळाडू आणि...

वर्ल्ड चॅम्पियन बांगलादेशी खेळाडूंचे असभ्य वर्तन, मैदानातच घातला राडा.

  • Share this:

पोटचेफ़्स्टरूम, 10 फेब्रुवारी : क्रिकेटला जेंटलमन गेम म्हणून ओळखला जाते. मात्र हल्ली क्रिकेटला स्लेजिंगचे ग्रहण लागले आहे. मात्र अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये एक लाजीरवाणा प्रकार घडला. टीम इंडियाला अंतिम सामन्यात तीन विकेटनं पराभूत करत पहिल्यांदा चॅम्पियन झालेल्या बांगलादेश संघाने मैदानातच राडा घातला. बांगलादेशच्या खेळाडूंनी सामना जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंना धक्काबुक्की करत शिव्याही घातल्या. या सगळ्या प्रकारानंतर बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीनेही माफी मागितली. असे म्हटले जात आहे की आयसीसीने संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

अंतिम सामन्यात बांगलादेशचे खेळाडू चक्क मैदानात बॅट आणि स्टम्प घेऊन आले होते. मैदानात झालेल्या या राड्यात अखेर पंचांना हस्पक्षेप करावा लागला. बांगलादेशचे खेळाडू खूपच आक्रमकता दाखवत प्रत्येक चेंडूनंतर भारतीय फलंदाजाला सतत काहीतरी सांगत असत. बांगलादेश विजयाच्या जवळ आल्यानंतरही इस्लाम कॅमेर्‍यासमोर शिव्या घालताना दिसला.

वाचा-बांगलादेशी खेळाडूंचे घाणेरडे वर्तन! टीम इंडियाला कॅमेरासमोर घातल्या शिव्या

खेळाडूंनी मर्यादा ओलांडल्या

सामन्यानंतर बांगलादेशी खेळाडू खूप वाईट वागले, असे मत भारतीय संघाचा कर्णधार प्रियम गर्गने व्यक्त केले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये तणाव होता. सामन्याच्या दुसऱ्या षटकात तन्झिम हसन साकीबच्या थ्रोवर दिव्यंश सक्सेना थोडक्यात बचावला. शाकिबने जाणीवपूर्वक सक्सेनाच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय भारतीय फलंदाज बाद झाल्यावर बांगलादेशचे गोलंदाजही घाणेरडे हावभाव करीत होते.

वाचा-प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यशस्वीसाठी ठरणार लकी? युवीसारखा होणार सुपरस्टार

बांगलादेशच्या कर्णधाराने मागितली माफी

बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने आपल्या संघातील खेळाडूंची वर्तणुकीवर दिलगिरी व्यक्त केली आणि असे घडले की जे घडले ते दुर्दैवी होते. बांगलादेशी कर्णधार अकबरने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत वयापेक्षा अधिक परिपक्वता दाखवताना, “आमचे काही गोलंदाज मूडमध्ये होते आणि अधिक उत्साही झाले. सामन्यानंतर जे घडले ते दुर्दैवी आहे. मी भारताचे अभिनंदन करू इच्छितो, असे सांगितले.

वाचा-टीम इंडिया झाली ट्रोल; ज्या कारणामुळे पाकची उडवली होती खिल्ली, तीच चूक केली!

अंतिम सामन्यात असा झाला टीम इंडियाचा पराभव

अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न पाचव्यांदा मोडले. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ 177 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या संघाने डकवर्थ लुईस नियमांच्या आधारे हा सामना 3 गडी राखून जिंकला. सामन्याच्या शेवटी पावसामुळे बांगलादेशला विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 42.1 षटकांत मिळवले. बांगलादेशचा संघ प्रथमच विश्वविजेता झाला.

First published: February 10, 2020, 1:05 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading