हॅमिल्टन, 10 फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह आपल्या गोलंदाजीच्या अनोख्या अॅक्शनमुळे ओळखला जातो. त्यामुळं मोठे फलंदाजही बुमराहच्या यॉर्करसमोर नांगी टाकतात. आता लहानमुलेही बुमराहच्या गोलंदाजीचे अनुकरन करताना दिसत आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर एका 15 वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याने बुमराहची हुबेहुब नक्कल केली आहे.
याआधी गेल्या वर्षी भारत ऑस्ट्रेलिया दौर्यावर असताचा आहे. यावेळी एक ऑस्ट्रेलियन मुलाचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये तो बुमराहच्या गोलंदाजीच्या हुबेहुब अनुसरण करीत आहे. यावर बुमराहनेही त्याचे कौतुक केले होते. आता न्यूझीलंडच्या एका युवा गोलंदाजाने जसप्रीत बुमराहची अक्शन कॉपी केली आहे.
वाचा-बांगलादेशी खेळाडूंचे घाणेरडे वर्तन! टीम इंडियाला कॅमेरासमोर घातल्या शिव्या
👏👏👏👏👏 https://t.co/jFrcfzao3x
— Scott Styris (@scottbstyris) February 8, 2020
वाचा-VIDEO : नेपाळच्या 15 वर्षीय क्रिकेटरचं अर्धशतक, सचिनलाही टाकलं पिछाडीवर
या युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा 15 वर्षांचा गोलंदाज बुमराहची हुबेहब कॉपी करीत आहे. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर काही मिनिटानंतर चाहत्यांनी मुलाची सर्वत्र स्तुती होत आहे. केवळ व्हिडिओच नाही तर न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरिसनेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली.
वाचा-टीम इंडिया झाली ट्रोल; ज्या कारणामुळे पाकची उडवली होती खिल्ली, तीच चूक केली!
How good is this kids impersonation of @Jaspritbumrah93 in Auckland. @BCCI @BLACKCAPS #woweee pic.twitter.com/0XDtSEqWaW
— Ollie Pringle (@OlliePringle63) February 7, 2020
जसप्रीत बुमराह सध्या न्यूझीलंडबरोबर एकदिवसीय मालिका खेळत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बुमराह खूपच किफायतशीर ठरला आहे, परंतु त्याला विकेटसाठी संघर्ष करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाविरुध्द त्याला फक्त एकच विकेट घेता आली होती. न्यूझीलंडविरुद्धही त्याला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडविरुद्ध सध्या सुरू असलेली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 2-0ने गमावली आहे. आता तिसरा सामना 11 फेब्रुवारी रोजी खेळवला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket