नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला भालाफेक खेळात सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर नीरज चोप्रा (Neeraj Chopra) या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असतो. आताही तो एका मासिकामुळे चर्चेत आला आहे. मासिकावरील त्याचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते भलतेच बुचकळ्यात पडले आहेत. हा खेळाडू आहे की मॉडेल? असे सवाल सोशल मीडियावर उपस्थित होतं आहेत.
भारताला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देत भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला होता. आता या गोष्टीला घडून जवळपास दोन महिने झाले असले तरी नीरजची हवा कायम राहिली आहे. दरम्यान नीरज सध्या, अनेक ब्रँड्सचे प्रमोशन करताना दिसत आहेत.
नुकतचं THE MAN या प्रसिद्ध मासिकात नीरज झळकला आहे. या मासिकांवरील त्याचे हटके फोटो पाहून बी टाउनच्या अभिनेत्यांही त्याने मागे टाकले असल्याची चर्चा रंगली आहे.
हे वाचा- IPL 2021: आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात KKR अडचणीत, 'लकी' खेळाडू होणार Out!
नीरजने काही फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यावेळी नीरजने एका प्रसिद्ध इलेक्ट्रिक कारसोबत फोटोशूट केलं असून तो या कारमध्ये बसून तसेच शेजारी उभा राहून फोटो काढताना दिसत आहे. नीरज चोप्रा यावेळी वेस्टर्न कपड्यात दिसत असून तो सूटमध्ये दिसत आहे. यावेळी काही फोटोत त्याने सूटमध्ये टी-शर्ट तर कधी शर्ट घातलं आहे.
View this post on Instagram
नीरजच्या या नव्या लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तसेच, त्याचा हा हटके लुक पाहून चाहते प्रेमात पडले आहेतच पण हा खेळाडू आहे की मॉडेल? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित होतं आहेत.
दरम्यान नीरज सध्या दुबईत मजा मस्ती करताना दिसत आहे. नुकतेच त्याने दुबईतील सुट्टी घालवतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.या फोटोंमध्ये नीरज दुबईतील प्रसिद्ध ठिकाणांना भेट देत आहे. काही फोटोंमधून नीरज दुबईतील नयनरम्य दृश्य नीरज दाखवत आहे. त्याने फोटोंना कॅप्शनमध्ये दुबईचं कौतुक करताना सुट्टीचे शेवटचे काही दिवस या ठिकाणी व्यतीत करुन फार बरं वाटलं असंही लिहिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021