Home /News /sport /

IPL 2021: आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात KKR अडचणीत, 'लकी' खेळाडू होणार Out!

IPL 2021: आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यात KKR अडचणीत, 'लकी' खेळाडू होणार Out!

केकेआरची (KKR) टीम आयपीएल फायनलच्या उंबरठ्यावर असून त्यांची आता दिल्ली कॅपिटल्सशी (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) लढत होणार आहे. आयपीएल स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली असताना केकेआर अडचणीत आली आहे.

    मुंबई, 13 ऑक्टोबर: आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात (IPL 2021, Phase 2) कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) जोरदार कामगिरी केली आहे. पहिल्या टप्प्यात पॉईंट टेबलमध्ये तळाशी असणाऱ्या केकेआरनं आता आयपीएल स्पर्धेच्या क्वालिफायरमध्ये (IPL 2021 qualifier 2) प्रवेश केला आहे. केकेआरनं मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये आरसीबीचा (KKR vs RCB) 4 विकेट्सनं पराभव केला.  सध्या ही टीम विजेतेपदापासून फक्त 2 पावलं दूर आहे. केकेआरची टीम आयपीएल फायनलच्या उंबरठ्यावर असून त्यांची आता दिल्ली कॅपिटल्सशी (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) लढत होणार आहे. आयपीएल स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली असताना केकेआर अडचणीत आली आहे. कारण, त्यांचा प्रमुख ऑल राऊंडर शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) फायनल खेळणार की नाही? याचा निर्णय आता बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) घेणार आहे. शाकिबनं कोलकाताच्या गेल्या तीन विजयाच महत्त्वाचे योगदान दिले आहे. शाकिब आयपीएल स्पर्धेत खेळत असल्यानं टी 20 वर्ल्ड कपपूर्वी (T20 World Cup 2021) श्रीलंकेविरुद्ध झालेल्या प्रॅक्टीस मॅचमध्ये खेळू शकला नव्हता. तसंच 14ऑक्टोबर रोजी आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या प्रॅक्टीस मॅचसाठीही तो उपलब्ध नसेल.  बांगलादेशची टीम या दोन प्रॅक्टीस मॅचनंतर 17 ऑक्टोबरपासून टी20 वर्ल्ड कपची पात्रता फेरी खेळणार आहे. त्यामुळे केकेआरची टीम फायनलमध्ये गेली तर शाकीब खेळणार की नाही? याचा निर्णय बांगलादेश बोर्ड घेणार आहे. KKR vs DC: चेन्नई विरुद्धच्या पराभवानंतर पंतची डोकेदुखी वाढली, दिग्गज खेळाडूला करणार बाहेर? शाकिबला फायनल खेळण्याची परवानगी दिली तर त्याला फायनलनंतर लगेच दुबईहून मस्कतला जावं लागेल.  हे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता बांगलादेश क्रिकेट बोर्ड शाकीबला काही दिवस विश्रांती देण्याबाबत विचार करत आहे. बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी 'क्रिकबझ' शी बोलताना ही माहिती दिली आहे. 'आम्ही आयपीएल क्वालीफायर 2 नंतर शाकीबबाबत निर्णय घेऊ. शाकीबची टीम फायनलमध्ये गेली तर त्याला आराम करण्यासाठी किती वेळ मिळेल याचा आम्हाला विचार करावा लागेल.' असं चौधरी यांनी सांगितलं. टी20 वर्ल्ड कपच्या सुपर 12 मध्ये प्रवेश करण्यासाठी बांगलादेशची पहिली मॅच 17 ऑक्टोबर रोजी स्कॉटलंड विरुद्ध होणार आहे. त्यानंतर 19 आणि 21 ऑक्टोबर रोजी त्यांची लढत अनुक्रमे ओमान आणि पापूआ न्यू गिनी विरुद्ध होईल. T20 World Cup: टीम इंडियाची लवकरच घोषणा! 4 नव्या खेळाडूंना मिळणार संधी KKR चा लकी खेळाडू शाकीब अल हसन हा 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या केकेआर टीमचा सदस्य आहे. त्यानं या दोन्ही फायनलमध्ये चांगली कामगिरी केली होती. आयपीएलच्या सेकंड हाफमध्ये आंद्रे रसेल जखमी झाल्यानंतर त्याला टीममध्ये संधी मिळाली. या संधीचा त्यानं फायदा घेतला आहे. सुनील नरीन आणि वरुण चक्रवर्ती या स्पिनर्सना शाकीबनं चांगली मदत केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, KKR

    पुढील बातम्या