मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /ये प्यार छुपाये भी नही छुपता! पृथ्वी शॉ आणि गर्लफ्रेंडचे काश्मीरमधील फोटो व्हायरल

ये प्यार छुपाये भी नही छुपता! पृथ्वी शॉ आणि गर्लफ्रेंडचे काश्मीरमधील फोटो व्हायरल

निधी तापडिया ही एक मॉडेल आणि अभिनेत्री असून मागील काही काळापासून तिचे नाव पृथ्वी शॉ सोबत जोडले जात आहे. परंतु यानात्यावर  पृथ्वी अथवा निधीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 जानेवारी : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु असल्याने तरुणाईमध्ये प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. यादरम्यान अनेकजण या आठवड्यात आपल्या प्रेमाच्या व्यक्तीला भेट वस्तू देऊन खुश करतात तर काही जण आपल्या प्रेमासोबत आवडत्या ठिकाणी एकांतात वेळ घालवतात. अशातच भारताचा युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ हा देखील त्याची कथित गर्लफ्रेंड निधी तापडिया सोबत काश्मीर येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी 20 मालिकेनंतर क्रिकेटर पृथ्वी शॉ सध्या काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. मात्र पृथ्वी याठिकाणी एकटाच गेला नसून त्याची कथित गर्लफ्रेंड निधी ही देखील त्याच्या सोबत असल्याचे बोलले जात आहे.

 हे ही वाचा  :  रिषभ पंतवर भडकले कपिल देव! म्हणाले, 'मी त्याच्या कानाखाली वाजवेन'

काही दिवसांपूर्वी त्यांच्यात ब्रेक अप झाल्याच्या बातम्या येत होत्या, परंतु हे दोघे पुन्हा एकत्र आल्याचे सांगितले जात आहे. याच कारण म्हणजे त्यांची काश्मीरच्या गुलमर्ग येथील ट्रिप. निधी आणि पृथ्वी शॉ या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर काश्मीर ट्रिपचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील एक सारख्या दृश्यांमुळे पृथ्वी आणि निधी हे ट्रीपवर सोबतच असल्याचे बोलले जात आहे. prithvi shaw at kashmir

निधी तापडिया ही एक मॉडेल आणि अभिनेत्री असून मागील काही काळापासून तिचे नाव पृथ्वी शॉ सोबत जोडले जात आहे. परंतु यानात्यावर  पृथ्वी अथवा निधीकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Jammu kashmir, Prithvi Shaw, Valentine week