टीम इंडियाला 2021 च्या वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश नाही, खेळावी लागणार पात्रता फेरी?

आयसीसीने न्यूझीलंडमध्ये 2021 ला होणाऱ्या वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.

आयसीसीने न्यूझीलंडमध्ये 2021 ला होणाऱ्या वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.

  • Share this:
    दुबई, 12 मार्च : महिला टी20 वर्ल्ड कपनंतर आता 2021 ला होणाऱ्या वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा आयसीसीने केली आहे. यामध्ये जगातील टॉप टेन संघ सहभागी होणार आहेत. मात्र या स्पर्धेसाठी टीम इंडियाला थेट प्रवेश देण्यात आलेला नाही. 6 फेब्रुवारी 2021 ते 7 मार्च 2021 या कालावधीत न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा होणार आहे. टीम इंडियाला आयसीसीच्या नियमांनुसार प्रवेश मिळाला नाही. वर्ल्ड कप स्पर्धेत आयोजक देश आणि वनडे इंटरनॅशनल चॅम्पियनशिपमधील चार अव्वल संघांसह पाच संघांना थेट प्रवेश मिळतो. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार यजमान असलेल्या न्यूझीलंडला, पहिल्या स्थानी असलेली ऑस्ट्रेलिया, तिसऱ्या क्रमांकावरच्या इंग्लंड, पाचव्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिका यांना थेट प्रवेश मिळाला आहे. मात्र भारत- पाकिस्तान यांचा निर्णय घेतलेला नाही. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध कोणताच सामना खेळत नाही. त्यामुळे भारतीय संघाला पॉइंट मिळालेले नाहीत. स्पर्धेत थेट प्रवेशासाठी दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने आय़सीसीकडे अर्ज केला आहे. दोन्ही संघांना समान गुण देण्याची मागणी बीसीसीआयने केली आहे. तर पाकने मात्र भारत सामना खेळण्यास तयार नाही त्यामुळे आम्हालाच सर्व गुण द्या असं म्हटलं आहे. भारत-पाक यांच्यातील वाद आता आयसीसीसमोर आहे. यात समान गुण देण्याचा निर्णय घेतल्यास भारत थेट वर्ल्ड कपमध्ये खेळू शकेल. मात्र पाकिस्तानला सगळे गुण दिले तर पाकिस्तान स्पर्धेत थेट प्रवेश मिळवेल आणि भारताला पात्रता फेरी खेळावी लागेल. हे वाचा : अजब लॉजिक! विराट-सेहवागमुळे टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये पराभव पात्रता फेरीची स्पर्धा जुलै महिन्यात लंकेमध्ये होणार आहे. यामध्ये टॉप 3 संघात स्थान मिळवलं तरच टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये खेळता येईल. 2021 चा वर्ल्ड कप रॉबिन राउंड पद्धतीने होईल. त्यामुळे लीग स्टेजमध्ये सर्व संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. हे वाचा : टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण! ‘हे’ चार खेळाडू लवकरच घेऊ शकतात निवृत्ती!
    First published: