मुंबई, 01 मार्च : भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे हा आपल्या शांत स्वभावासाठी आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. 2011मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या अजिंक्यने कित्येकदा भारतीय संघाला एकहाती सामने जिंकून दिले. त्यामुळेच रहाणे हा भारतीय संघातील एक भरवशाचा खेळाडू आहे. मात्र रहाणेचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक संघर्ष राहणेला करावे लागले. नुकत्याच एका कार्यक्रमात रहाणेनं आपला संघर्षमय प्रवास सांगितला. अजिंक्य रहाणे सध्या न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत रहाणेला विशेष चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्यने आपल्या क्रिकेट करिअरचे श्रेय आपल्या आईला दिले. रहाणेनं आपल्या संघर्षाबद्दल सांगताना, “आम्ही डोंबिवलीला राहायचो. त्यावेळी आमच्याकडे जास्त पैसे नव्हते. त्यामुळं मी आणि आई रोज सात-आठ किमी चालत जायचो”, रहाणे भावुक झाला होता. अजिंक्यने आपल्या आईचा करिअरमागे मोठा हात असल्याचे सांगत, आईच्या एका हातात मी व दुसऱ्या हातात माझा छोटा भाऊ असायचा. पण तरी आईने कधी रागराग केला नाही, असे सांगितले. हेही वाचा- फक्त धोनी नाही तर ‘हे’ दिग्गज खेळाडूही IPLमधून घेणार निवृत्ती हेही वाचा- श्रेयस अय्यरला मोठा झटका, दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा गोलंदाज खेळणार नाही IPL आई-वडिलांना दिले श्रेय अजिंक्य रहाणेनं आपल्या करिअरबाबत सांगताना, “मी सात वर्षांच्या असल्यापासून क्रिकेटचा सराव करतोय. पण या काळात सगळ्यात जास्त मला कोणी पाठिंबा दिला असेल तर ते माझे आई-बाबा. क्रिकेट प्रॅक्टिससाठी सीएसएमटीला जायचो तेव्हा पहिल्या दिवशी बाबासोबत होते. पण त्यानंतर त्यांनी मला स्वावलंबी केले. मला डोंबिवली स्टेशनला सोडून ते निघून जायचे. त्या दिवसापासून मी एकटाच प्रवास करायचो”, असे मत व्यक्त केले. हेही वाचा- विमान नाही, पक्षी नाही; हा तर फ्लाइंग जडेजा! कॅचचा अफलातून VIDEO हेही वाचा- दुसऱ्या दिवशीही भारतीय संघ अडचणीत, 90 धावांवर गमावल्या 6 विकेट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







