ख्राइस्टचर्च, 01 मार्च : भारत-न्यूझीलंड यांच्यात ख्राइस्टचर्च येथे दुसरा कसोटी सामना होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर रवींद्र जडेजाचा सुपरमॅन अवतार पाहायला मिळाला. जडेजाने हवेत उडी घेत, जबरदस्त कॅच पकडला. जडेजा हा जगातला सर्वोत्तम फिल्डरपैकी एक आहे. संघाला विकेटची गरज असताना शमीनं टाकलेल्या चेंडूवर जडेजानं हवेत उडी घेत जबरदस्त कॅच घेतला. जडेजाच्या या कॅचमुळं नेइल वॅगनर 21 धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवशी भारतानं जबरदस्त कमबॅक केला असला तरी, न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी भारताच्या नाकी दम आणला.
दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चांगला कमबॅक केला. पहिल्या पहिल्या दोन सेशनमध्ये बुमराह, शमीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडचे फलंदाज टिकू शकले नाही. बुमराहने केन विल्यम्सनला 3 धावांवर माघारी धाडले. तर, रॉस टेलरही 15 धावांवर बाद झाला. मात्र कॉलिन डी-ग्रँडहोम आणि कायल जॅमिसन यांनी भारतीय गोलंदाजांना रडवलं. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत न्यूझीलंडला चांगल्या स्थितीत पोहचवलं. मात्र जडेजाच्या कॅचने सामन्याचे रुप पालटलं.
वाचा-कशी आहे भारताच्या महिला क्रिकेट संघाची ड्रेसिंग रूम? पाहा VIDEO
Sir Unbelievable Ravindra Jadeja #NZvsIND #INDvsNZ #INDvsNZTestCricket #NZvIND #jadeja #ViratKohli #Cricket https://t.co/S7BeICVBRN
— Game Onn_ (@Bantish_bunny) March 1, 2020
वाचा-आला रे आला! रोहितचे ‘हे’ 5 शिलेदार मुंबईला पुन्हा एकदा करणार IPL चॅम्पियन
याआधी कायलने 5 विकेट घेत भारतीय फलंदाजाचे कंबरडे मोडले होते. तर, फलंदाजीमध्ये त्यानं 49 धावांची खेळी केली. त्यामुळं दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने 235 धावांपर्यंत मजल मारली. तळाच्या फलंदाजांमुळे चांगली गोलंदाजी करूनही भारताला केवळ 7 धावांची आघाडी मिळाली आहे.
वाचा-क्रिकेटपटूनं 19 वर्षीय तरुणीशी केलं लग्न, नातेवाईकाला समारंभातच झाली मारहाण
पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा खेळ 63-0वर थांबला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच उमेश यादवने भारताला पहिले यश मिळवून दिले. टॉम ब्लंडेल 30 धावांवर बाद झाल्यानंतर केन विल्यम्सनलाही बुमराहनं 3 धावांवर बाद केले. न्यूझीलंडची मधली फळी अयशस्वी ठरली असली तरी, तळाच्या फलंदाजांची चांगली कामगिरी केली. भारताकडून मोहम्मद शमीने 4, जसप्रीत बुमराहने 3, उमेश यादवने 1 तर रवींद्र जडेजाने कायलला बाद करत न्यूझीलंडचा डाव संपवला.