ख्राइस्टचर्च, 01 मार्च : इंडियन प्रीमिअर लीगच्या तेराव्या हंगामाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात 29 मार्चपासून होत आहे. मात्र त्याआधीच बऱ्याच खेळाडूंनी दुखापतीमुळे माघार घेतली आहे. आता दिल्ली कॅपिटल्स संघाचा महत्त्वाचा गोलंदाज इशांत शर्माही आयपीएलमधील सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही आहे. त्यामुळं दिल्ली संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला मोठा धक्का बसला आहे. इशांत शर्माच्या घोट्याच्या दुखापतीमुळे त्यांन भारत-न्यूझीलंड दौऱ्यातूनही माघार घेतली आहे. आता त्याला आयपीएल 2020मध्ये सुरुवातीचे काही सामने खेळता येणार नाही आहेत. इशांतच्या दुखापतीमुळे बीसीसीआय आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी यांच्यात वाद झाला आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) मुख्य फिजिओ आशिष कौशिक या वादात अडकले आहे. दुखापतीमुळे इशांत शर्माला पुन्हा एकदा एनसीएला जावे लागणार आहे. इशांतने पहिल्या कसोटीच्या 72 तासांपूर्वी न्यूझीलंडमध्ये भारतीय संघात प्रवेश केला आणि 5 विकेट मिळवण्याची कामगिरीही केली. मात्र इशांत शर्माच्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढले आहे. यामुळं बीसीसीआय आणि एनसीएलच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एवढेच नाही तर बीसीसीआयच्या मीडिया टीमने 24 तासांनंतर एक पत्र जारी केला, मात्र यात इशांतबाबत कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती दिली गेली नव्हती. बीसीसीआयनं अनफिट इशांतला दिलं संघात जागा? या दुखापतीमुळे बीसीसीआयमधील अंतर्गत वाद समोर आले आहे. बीसीसीआय अधिकाऱ्यांनी नाव न देण्याच्या अटीवरून सांगितले की, “इशांतला दिल्ली टीम फिजिओने स्कॅनच्या अहवालाच्या आधारे सहा आठवड्यांसाठी विश्रांती घेण्यास सांगितले होते. इशांतची दुखापत 3 ग्रेड होती, मग कौशिक आणि एनसीए टीमने त्याला तीन आठवड्यातच फिट असल्याचे सांगितले. इशांतला पुरेसा कालावधी न मिळाल्यामुळं त्याला पुन्हा दुखापत झाली”. इशांत शर्मानं माघार घेतल्यामुळं भारतीय संघात त्याची जागा उमेश यादवने घेतली आहे. दिल्ली संघाच्या अडचणी वाढल्या इशांत शर्मा आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाकडून शर्मानं 13 सामन्यात 13 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळं दिल्ली संघासाठी हा मोठा धोका असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







