जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Under 19 Asia Cup : नवे आहेत पण छावे आहेत! पुन्हा एकदा भारत झाला आशियाई चॅम्पियन

Under 19 Asia Cup : नवे आहेत पण छावे आहेत! पुन्हा एकदा भारत झाला आशियाई चॅम्पियन

Under 19 Asia Cup : नवे आहेत पण छावे आहेत! पुन्हा एकदा भारत झाला आशियाई चॅम्पियन

बांगलादेशला सहज शक्य असताना युवा गोलंदाजांनी भारताचा विजय खेचून आणला.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलंबो, 14 सप्टेंबर : श्रीलंकेत सुरू झालेल्या अंडर-19 आशियाई कपमध्ये भारताच्या युवा खेळाडूंनी पुन्हा एकदा आपली कमाल दाखवली. भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं केवळ पाच धावांनी विजय मिळवला. यात महाराष्ट्राच्या अथर्व अंकोलेकरनं भारताला विजय मिळवून दिला. भारतीय फलंदाजांनी केलेल्या 106 धावांचा पाठलाग करणे बांगलादेशला सहज शक्य असताना युवा गोलंदाजांनी भारताचा विजय खेचून आणला. भारताकडून गोलंदाजीमध्ये अथर्व अंकोलेकरनं 22 धावा देत 5 विकेट घेतल्या. तर, आकाश सिंग 12 धावा देत 3 विकेट घेतल्या. गोलंदाजीमध्ये अथर्व अंकोलेकरनं 22 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर, आकाश सिंग 12 धावा देत 3 विकेट घेतल्या. अंडर-19 आशियाई कपच्या अंतिम सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. महत्त्वाचे म्हणजे भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांनी सेमीफायनलचा सामना न खेळताच फायमनमध्ये प्रवेश केला. पावसामुळं सेमीफायनलचा सामना होऊ न शकल्यामुळं लीग स्टेजमध्ये सर्व सामने जिंकत भारत आणि बांगलादेश यांनी फायनलमध्ये प्रवेश केला.

जाहिरात

भारतीय संघाची खराब फलंदाजी टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय संघाच फळास आला नाही. भारताच्या सलामीवीरांना चांगली कामगिरी करता आली नाही. सलामीचा फलंदाज अर्जुन आझाद खाते न उघडताही बाद झाला. त्यानंतर तिळक वर्मालाही चांगली कामगिरी करता आली नाही, तो केवळ 2 धावा करत बाद झाला. त्यानंतर सुवेश पारकर 4 धावा करत बाद झाला. त्यामुळं भारतानं 16 धावांतच 4 विकेट गमावल्या. कर्णधार ध्रुव जुरेलनं सांभाळली खेळी भारतीय संघाचा कर्णधार ध्रुव जुरेलनं शाश्वत रावतसोबत खेळ सावरला. 8 धावात 3 विकेट गमावल्यानंतर कर्णधारानं संघाला 50चा आकडा पार करून दिला. संघ चांगल्या स्थितीत असतानाच 45 धावांची भागिदारी बांगलादेशच्या शामिम हुसैननं मोडली. 19 धावा करत शाश्वत माघारी परतला. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी भारताचा डाव सांभाळला. करण लालच्या 37 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 100चा आकडा गाठला आणि भारताचा डाव 33 ओव्हरमध्ये 106मध्ये आटपला. भारतानं पुन्हा केली कमाल 1989पासून सुरू झालेल्या आशियाई चषक स्पर्धेत बांगलादेशच्या संघानं एकदाही विजेतेपदक पटकावलेले नाही. परिणामी भारतानं आतापर्यंत 5 वेळा तर 2012मध्ये पाकिस्तान आणि भारत यांना संयुक्तपणे विजेतेपद देण्यात आले. 2017मध्ये भारताला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. 2017मध्ये अफगाणिस्ताननं विजेतेपद पटकावले होते. या माणसाला चहा-कॉफी किंवा तंबाखू नाही तर लागलंय भलतंच व्यसन, पाहा VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात