सिल्हेत-बांगलादेश, 6 ऑक्टोबर: शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान संघात महिलांच्या आशिया कपमधला महत्वाचा मुकाबला होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघानं स्पर्धेतले पहिले तिन्ही सामने जिंकून पॉईंट टेबलमध्ये पहिलं स्थान कायम राखलं आहे. भारतानं सलामीलाच श्रीलंकेला हरवलं. त्यानंतर मलेशिया आणि यूएईलारख्या दुबळ्या संघांना सहजपणे हरवलं. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरण्यास पूर्ण तयारीनिशी टीम इंडिया सज्ज झाली आहे. पण पहिले दोन सामने जिंकणाऱ्या पाकिस्तानला महामुकाबल्याआधी थायलंडसारख्या संघानं चांगलाच तडाखा दिला. थायलंडनं पाकिस्तानला हरवलं आधी बांगलादेश आणि मग श्रीलंकेकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर थायलंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध आज मैदानात उतरला. पण आज थायलंडच्या बॉलर्स एका वेगळ्याच निर्धारानं मैदानात उतरल्या होत्या. त्यांनी अचूक मारा करताना पाकिस्तानला 20 ओव्हर्समध्ये 116 रन्समध्येच रोखलं. आणि त्यानंतर झालेल्या रोमहर्षक लढतीत 117 धावांचं टार्गेट थायलंडनं शेवटच्या ओव्हरमध्ये एक बॉल बाकी ठेऊन पार केलं. थायलंडसाठी हा ऐतिहासिक विजय ठरला. तर पहिल्या दोन्ही लढती जिंकणाऱ्या पाकिस्तानला थायलंडच्या संघानं जमिनीवर आणलं. हेही वाचा - Ind vs SA ODI: आधी बाबर आणि आता मारक्रम… पाहा ‘चायनामन’ कुलदीप यादवची जादू, Video चँतमची विक्रमी खेळी थायलंडची सर्वोत्तम फलंदाज नथ्थकन चँतमची खेळी निर्णायक ठरली. 117 धावांचा पाठलाग करताना तिनं सलामीला येत 51 बॉलमध्ये 61 धावा केल्या. त्यामुळे थायलंडचा विजय सोपा झाला. महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये थायलंडनं आज पहिल्यांदाच पाकिस्तानला हरवण्याचा पराक्रम गाजवला.
Natthakan Chantam scored a blitzkrieg of a 61 from 51 balls to help lead her team to victory against a formidable Pakistan team.
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) October 6, 2022
How many more fifties will Natthakan score this tournament? @ThailandCricket #PAKvTHAI #WomensAsiaCup2022 #AsianCricketCouncil #ACC pic.twitter.com/ymxuBMUkPf
पाकला पुन्हा हरवण्यासाठी टीम इंडिया सज्ज गेल्या तीन सामन्यात भारतीय संघानं महामुकाबल्याआधी चांगलाच सराव करुन घेतला. भारतानं तिन्ही सामने मोठ्या फरकानंही जिंकले आहेत. त्यामुळे उद्याच्या सामन्यात त्याच आत्मविश्वासानं हरमनप्रीत कौर अँड कंपनी मैदानात उतरेल. दरम्यान हा सामना जिंकल्यास टीम इंडिया सलग चार सामने जिंकून आपलं सेमी फायनलमधलं स्थान पक्कं करेल. याआधी दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतानं पाकिस्तानी संघाला पराभवाची धूळ चारली होती. हेही वाचा - Cricket: IPL खेळलेल्या या क्रिकेटरला अटक, बलात्काराचा गंभीर आरोप; पाहा काय आहे प्रकरण? भारत वि. पाकिस्तान, महिला आशिया कप साखळी सामना सिल्हेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सिल्हेत-बांगलादेश शुक्रवारी दुपारी 1.00 वाजता स्टार स्पोर्टस आणि डिस्ने हॉटस्टारवर थेट प्रक्षेपण