लखनौ, 6 ऑक्टोबर: पावसामुळे दोन तास उशीरानं झालेल्या लखनौच्या पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं दमदार फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेनं 40 ओव्हरमध्ये 4 बाद 249 धावा स्कोअर बोर्डवर लावल्या. एनरिच क्लासेन आणि डेव्हिड मिलर या मधल्या फळीतील दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी अभेद्य शतकी भागीदारी साकारली. मिलरनं 63 बॉल्समध्ये 75 तर क्लासेननं 65 बॉल्समध्ये 75 धावांचं योगदान दिलं. पण दक्षिण आफ्रिकेच्या या डावादरम्यान गोलंदाजी करताना भारताचा रिस्ट स्पिनर कुलदीप यादवनं आपल्या कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कुलदीपनं आपला 8 ओव्हरचा कोटा पूर्ण करताना जवळपास 5 च्या इकॉनॉमीनं 39 रन्स देत एक विकेट घेतली. पण त्यानं घेतलेली एकमेव विकेट या सामन्याचं वैशिष्ट्य ठरली. या विकेटनं 2019 च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये कुलदीपनं काढलेल्या बाबर आझमच्या विकेटची आठवण करुन दिली. कुलदीपकडून एडन मारक्रमची शिकार लखनौच्या या सामन्यात शार्दूल ठाकूरनं मोक्याच्या क्षणी दोन विकेट्स काढून दक्षिण आफ्रिकन फलंदाजांवर दबाव टाकला होतात. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर एडन मारक्रम मैदानात आला. यावेळी कर्णधार धवननं कुलदीपच्या हातात बॉल दिला. कुलदीपच्या चायनामन बॉलिंगसमोर एडन मारक्रम पूर्णत: फसला आणि बोल्ड झाला. या विकेटचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.
Absolute Beaut! 🙌 🙌@imkuldeep18 gets Aiden Markram out with a ripper! 👍 👍 #TeamIndia
— BCCI (@BCCI) October 6, 2022
Follow the match ▶️ https://t.co/d65WZUUDh2
Don’t miss the LIVE coverage of the #INDvSA match on @StarSportsIndia. pic.twitter.com/KMajjtsA67
2019 साली कुलदीप यादवनं वन डे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बाबर आझमची अशीच विकेट काढली होती.
हेही वाचा - T20 World Cup: टी20 वर्ल्ड कपला निघण्यापूर्वी रोहित शर्माचं सिद्धिविनायकाला साकडं, फोटो व्हायरल दक्षिण आफ्रिकेचा धावांचा डोंगर एडन मारक्रम (0), कॅप्टन टेंबा बवुमा (8), यानेमन मलान (22) हे तीन बॅट्समन फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत. पण क्विंटन डी कॉकनं टी20तला आपला फॉर्म वन डेतही कायम ठेवताना 48 धावांची खेळी केली. डी कॉक आऊट झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची स्थिती 4 बाद 110 अशी होती. पण त्यानंतर मिलर आणि क्लासेननं डावाची सूत्र आपल्या हाती घेत 139 धावांची अभेद्य भागीदारी साकारली. भारताकडून शार्दूलनं दोन तर कुलदीप आणि रवी बिश्नोईनं प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यात खराब फिल्डिंगचा फटका भारतीय संघाला बसला. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सिराज आणि रवी बिश्नोई यांनी झेल सोडले. त्याचाच फायदा घेत दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली.

)







