दुबई, 8 सप्टेंबर**:** आशिया चषकातल्या सलग दोन पराभवांनंतर टीम इंडियाचं आशिया चषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. काल पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा पराभव केला आणि भारताच्या उरल्यासुरल्या आशाही संपल्या. त्यामुळे आशिया चषकातल्या सुपर फोर फेरीतील अफगाणिस्तान आणि भारताचा सामना हा औपचारिक स्वरुपाचा असेल. पण या सामन्यात आधीच्या चुका टाळून स्पर्धेची विजयी सांगता करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. योग्य संघनिवड महत्वाची सुपर फोरच्या पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघव्यवस्थापनानं चुकीची संघनिवड केली. खुद्द कर्णधार रोहित शर्मानंही प्लेईंग इलेव्हन निवडण्यात झालेल्या चुकीची कबुली दिली होती. पण आता त्या चुका टाळून स्पर्धेतल्या या शेवटच्या सामन्यात भारतीय संघ मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे. दीपक चहर संघात भारतीय संघाला यंदाच्या आशिया चषकात खेळाडूंच्या दुखापतीचा मोठा फटका बसला. स्पर्धेआधी जसप्रीत बुमरा आणि हर्षल पटेल संघाबाहेर गेले. त्यानंतर स्पर्धेदरम्यान रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे बाहेर गेला. त्यानंतर आवेश खानही तब्येत ठीक नसल्यानं संघात खेळू शकला नाही. त्यामुळे या सगळ्याचाही फटका भारतीय संघाला बसला. दरम्यान आवेश खानच्या जागी भारतीय संघात वेगवान गोलंदाज दीपक चहरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध तो अंतिम अकरात खेळण्याची शक्यता जास्त आहे. याशिवाय जाडेजाऐवजी संघात घेतलेल्या अक्षर पटेलला रोहितनं एकाही सामन्यात संधी दिली नाही. आजच्या सामन्यात रोहित ती चूक सुधारणार का? हेही पाहावं लागेल. हेही वाचा - VIDEO: युजवेंद्र चहलच्या पत्नीला झाली होती गंभीर दुखापत; शस्त्रक्रियेनंतर समोर आली हेल्थ अपडेट संभाव्य भारतीय संघ - रोहित (कर्णधार), लोकेश राहुल, विराट, सूर्यकुमार, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, दीपक चहर, अर्शदीप सिंग भारत वि. अफगाणिस्तान, सुपर**-4** सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम**,** दुबई संध्याकाळी 7.30 वा. स्टार स्पोर्टस, हॉट स्टारवर थेट प्रक्षेपण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.