मुंबई, 8 सप्टेंबर- भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी आणि कोरियोग्राफर धनश्री वर्माचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धनश्री गुडघ्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर पुन्हा एकदा तितक्याच उत्साहात पुनरागमन करण्यास सज्ज दिसत आहे. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओमध्ये धनश्रीच्या धैर्याचं, आत्मविश्वासाचं आणि संयमाचं कौतुक करत आहेत. धनश्री वर्माच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. एका डान्स सेशनदरम्यान धनश्री वर्माचा पाय मुरगळला होता. यामध्ये तिच्या एका लिगामेंटला जबर दुखापत झाली होती. त्यामुळे तिच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. असह्य वेदनेतून सावरलेली धनश्री, लवकरच पुन्हा एकदा धमाकेदार डान्स करताना दिसणार आहे. धनश्रीने नुकतंच सोशल मीडियावर आपल्या या जर्नीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आह. ज्यामध्ये धनश्रीची शस्त्रक्रिया आणि त्यानंतरची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला असे दिसते की, डान्स रिहर्सल करत असताना अचानक धनश्रीचा पाय मुरगळतो आणि ती खाली कोसळते. यानंतर धनश्रीची हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया ते फिजिओथेरपी आणि त्यानंतर होत असलेली रिकव्हरी असा हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे.
**(हे वाचा:** Koffee With Karan 7: अनन्या पांडेसोबत ब्रेकअपवर ईशान खट्टरने सोडलं मौन, म्हणाला… ) 21 ऑगस्ट रोजी कोरियोग्राफर धनश्रीने आपल्या लिगामेंटला जबर दुखापत झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.धनश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवरुन चहल हे आडनाव हटवत तिने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. परंतु नंतर युजवेंद्र चहल आणि धनश्रीने आपल्यात सर्वकाही ठीक असून या सर्व अफवा असल्याचा खुलासा केला होता.