जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs WI: 4 बॉलमध्ये काम तमाम करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या ऑल राऊंडरचा Team India ला इशारा

IND vs WI: 4 बॉलमध्ये काम तमाम करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या ऑल राऊंडरचा Team India ला इशारा

Jason Holder

Jason Holder

IND vs WI: क्रिकेटच्या झटपट फॉरमॅटमध्ये इंग्लंडला धूळ चारल्यावर विंडीज संघ आता भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही देशांत 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचच्या सीरिज (India vs West Indies) खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, 4 बॉलमध्ये इंग्लंडच्या संघाचे काम तमाम करणाऱ्या विंडीजच्या घातक ऑल राऊंडर जेसन होल्डरने (Jason Holder) टीम इंडियाला घरच्या मैदानातच हरवण्याचा इशारा दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: क्रिकेटच्या झटपट फॉरमॅटमध्ये इंग्लंडला धूळ चारल्यावर विंडीज संघ आता भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही देशांत 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचच्या सीरिज (India vs West Indies) खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, 4 बॉलमध्ये इंग्लंडच्या संघाचे काम तमाम करणाऱ्या विंडीजच्या घातक ऑल राऊंडर जेसन होल्डरने (Jason Holder) टीम इंडियाला घरच्या मैदानातच हरवण्याचा इशारा दिला आहे. इंग्लंड (England) संघाविरुद्ध यजमान वेस्ट इंडिजने (West Indies) पाच सामन्यांची टी-20 मालिका 3-2 अशी आपल्या नावे केली. बार्बाडोस (Barbados) येथे झालेल्या मालिकेच्या निर्णायक सामन्यात विंडीजचा घातक ऑल राऊंडर जेसन होल्डरने (Jason Holder) संघाच्या विजयात मुख्य भूमिका बजावली. त्याने 4 चेंडूत 4 विकेट घेतल्या. त्याच्या भेदक माऱ्यासमोर गडबडलेल्या इंग्लंडला या सामन्यात 17 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता त्याचे लक्ष्य भारत असल्याचे त्याने सांगितले. भारतात रवाना होण्यापूर्वी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने टीम इंडियाला इशारा दिला. ‘‘भारत हा सध्या जगातील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेट संघ आहे यात शंका नाही. पण वेस्ट इंडिजकडेही भारताला घरच्या मैदानावर पराभूत करणारा संघ आहे.’’ असे वक्तव्य होल्डरने केले. त्यानंतर विंडीजचा कर्णधार कायरान पोलार्डनेदेखील अशाच प्रकारे दावा केला आहे. आम्हाला इंग्लंडविरुद्ध चांगला विजय मिळाला. भारत दौऱ्यावर आमची नजर आहे. रोहित शर्माच्या टीम इंडियाविरुद्ध खेळणे खरोखरच खास असेल आणि आम्ही येथेही इंग्लंडविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करू इच्छितो. असे वक्तव्य पोलार्डनेही केले आहे. वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्य आणि टी-20 मालिकेसाठी 16 सदस्यांची निवड केली आहे. दोन्ही संघांचे नेतृत्व कायरन पोलार्डकडे असेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वनडे मालिका 6 फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये सुरू होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू अहमदाबादला रवाना झाले आहेत. वनडे कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिली वनडे मालिका असेल. तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाने 18 सदस्यीय संघाची निवड केली आहे. यामध्ये कुलदीप यादवचीही निवड झाली आहे. तर आर अश्विनला टी-20 आणि एकदिवसीय संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात