मुंबई, 29 नोव्हेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 6 नोव्हेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. तर, वेस्ट इंडिजनं पोलार्डच्या नेतृत्वाखाली आपला संघ जाहीर केला आहे. काही महिन्यांपूर्वी पोलार्डला एकदिवसीय आणि टी-20 संघाचे कर्णधारपद मिळाले. यातच अफगाणिस्तानला नमवल्यानंतर भारतीय संघाला हरवण्याचे आव्हान पोलार्डसमोर असणार आहे. याआधी वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला होता. आता वेस्ट इंडिजचा संघ भारतीय दौऱ्यावर येत आहे. याआधी वेस्ट इंडिजला टीम इंडियानं त्यांच्या घरात नमवले होते. त्यामुळं वेस्ट इंडिजचा संघ बदला घेण्याचा तयारीत आहे. दरम्यान सोशल मीडियावर रोहित आणि पोलार्ड यांच्यात ट्विटरवर वॉर सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पहाटे 4 वाजता पोलार्डन रोहित शर्माची झोप उडवली, यानंतर शर्मानं ट्विटरवर राग व्यक्त केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टार स्पोर्ट्सनं भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ही जाहीरात तयार करण्यात आली आहे. यात रोहित शर्माला झोपलेला असताना पहाटे 4 वाजता त्याला वेक अप कॉल येतो. या कॉलवर पोलार्डनं उठवण्यास सांगितले, असे सांगितल्यानंतर रोहित शर्मानं संतापत फोन आटपला. यानंतर रोहित शर्मानं रागाची इमोजी टाकत पोलार्डला टॅग केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- श्रेयस अय्यरचा ‘धोनी’ अवतार! हेलिकॉप्टर शॉटचा VIDEO VIRAL
Good morning, Brohit.
— Kieron Pollard (@KieronPollard55) November 29, 2019
Hope you got your ‘wake up call’ ahead of #INDvWI! 🤙😜#PollardsPayback @ImRo45 pic.twitter.com/nkAPkeef2x
वाचा- आज पुन्हा मौका-मौका! पाकिस्तानला चारीमुंड्या चित करण्यासाठी भारत सज्ज असा आहे भारत-वेस्ट इंडिज दौरा 6 डिसेंबर 2019 - पहिला T20I, मुंबई 8 डिसेंबर 2019 - दुसरा T20I, तिरुवनंतपुरम 11 डिसेंबर 2019 - तिसरा T20I, हैदराबाद वाचा- काय म्हणावं या शॉटला? फलंदाजाची अतरंगी बॅटिंग पाहून प्रेक्षकही चक्रावले T20I मालिकेसाठी भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार. वेस्ट इंडिजचा संघ- कॅरेन पोलार्ड (कर्णधार), फेबियन एलेन, शेल्डन कोटरेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, ब्रेंडन किंग, ईविन लुईस, कीमो पॉल, निकोलस पूरन, केरी पिएरे, दिनेश रामदीन, शेरफेन रुदरफोर्ड, लेंडल सिमंस, हेडल वॉल्श जूनियर आणि केसरिक विलियम्स.

)







