नूर-सुल्तान, 29 नोव्हेंबर : भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे दोन्ही देशांसाठी एक वेगळी पर्वणी असते. दरम्यान, यावेळी भारत-पाक यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर द्वंद्व युध्द नाही तर टेनिसमध्ये आमने-सामने येणार आहेत. अनेक राजकिय अडचणींनंतर अखेर आज डेव्हिस कपमध्ये कझाकिस्तानच्या नूर-सुल्तान येथे भारत-पाक सामना होणार आहे. त्यामुळं भारतीय चाहत्यांसाठी ही एक पर्वणी असणार आहे. डेव्हिस कपमध्ये भारतानं तब्बल 7 वेळा पाकला नमवले आहे. त्यामुळं यंदाही मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघ कमकुवत पाक संघाला हरवण्यासाठी सज्ज आहे. आज दुपारी 1.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. पाकिस्तानमध्ये भारतीय संघानं खेळण्यास नकार दिल्यानंतर नूर-सुल्तान येथे सामने आयोजित करण्यात येणार आहे. या सामन्यात भारताकडून सुमित नागल, रामकुमार रामनाथन आणि अनुभवी लिएंडर पेस यांच्यासारख्या स्टार खेळाडूंची उपस्थिती मोलाची असणार आहे. दुसरीकडे पाक संघा युवा खेळाडूंना घेऊन मैदानात उतरणार आहे. या सामन्यात जो संघ बाजी मारेल त्या संघाला 2020च्या विश्व ग्रुप क्वालिफायरमध्ये जागा मिळेल. तर, 46 वर्षीय पेसकडे डबल्समध्ये बाजी मारत आपला रेकॉर्ड चांगला करण्याची संधी असणार आहे. आज रामकुमार मुहम्मद शोएब विरोधात सामना खेळत या स्पर्धेची सुरुवात करणार आहे.
तर, सिंगल्समध्ये सुमित नागल आणि हुजाएफा अब्दुल रहमान यांच्यात सामना होणार आहे. शुन्यापेक्षा कमी तापमानात हे सामने खेळले जाणार आहे. शनिवारी दुसऱ्या दिवशी पेस आणि जीवन यांची जोडी शोएब आणि हुजाएफा यांच्याविरुद्ध खेळणार आहे. जर, भारताला 3-0नं आघाडी घ्यायची आहे तर, त्यांना पहिले तीन सामने जिंकावे लागणार आहेत.
भारत-पाक यांच्यात पहिला सामना 1962मध्ये लाहोर येथे झाला होता. ही स्पर्धा भारतानं 5-0नं जिंकली होती. त्यानंतप 1963मध्ये पुण्यात झालेल्या सामन्यात भारतानं 4-1ने, 1964मध्ये लाहोरमध्ये 4-1ने, 1970मध्ये पटना येथे 3-1ने, 1973मध्ये कुआलालम्पुर येथे 4-0ने आणि 2006मध्ये मुंबईत पाकिस्तानला 3-2ने नमवले होते. दरम्यान 13 वर्षांनंतर भारतीय संघ पुन्हा आमने-सामने येणार आहेत.

)







