जमैका, 01 सप्टेंबर : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या कसोटीत विंडीजच्या 6 फलंदाजांना तंबूत धाडलं. या सामन्यात त्यानं हॅटट्रिकही नोंदवली. कसोटीत हॅटट्रिक करणारा बुमराह तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. बुमराहनं गेल्या वर्षी पदार्पण केलं होतं. इतक्या कमी कालाधीत त्यानं आयसीसीच्या रँकिंगमध्ये 7 व्या स्थानी झेप घेतली आहे. बुमराहनं त्याच्यातल्या क्षमतेच्या जोरावर इथंपर्यंत पोहचला असला तरी नशिबानेही त्याला साथ दिली आहे. तीन वर्षांपुर्वी 2016 मध्ये एका खेळाडुच्या दुखापतीने बुमराहला संधी मिळाली होती. तो दुखापत झालेला खेळाडु होता मोहम्मद शमी. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला हॅमस्ट्रिंग इंज्युरी झाली होती. त्यानंतर बुमराहला टी20 मालिकेसाठी संघात जागा मिळाली. त्याने 26 जानेवारी 2016 ला पहिला आंतरराष्ट्री सामना खेळला होता. यामध्ये बुमराहनं 3.3 षटकांत 23 धावा देत 3 गडी बाद केले होते. हा सामना भारतानं 37 धावांनी जिंकला होता. बुमराहनं तीन टी20 सामन्यात 6 विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका जिंकल्यानंतर तेव्हाचा कर्णधार धोनीने बुमराहबद्दल भविष्यवाणी केली होती. बुमराह भारतीय क्रिकेटचा मोठा शोध असल्याचं धोनीने म्हटलं होतं. बुमराहची लाइन आणि लेंथचं कौतुक करताना त्याचं भविष्य उज्ज्वल असल्याचं म्हटलं होतं. त्याच्यामध्ये सामना जिंकून देण्याची ताकद असून भारताची गोलंदाजीची बाजू भक्कम झाली असल्याचंही धोनी म्हणाला होता. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने जसप्रीत बुमराहला मोठा खेळाडू म्हटलं होतं. ज्यावेळी बुमराहची संघात निवड झाली होती तेव्हा आरपी सिंगने त्याच्या यॉर्करचं कौतुक केलं होतं. तसेच जो गोलंदाज धोनीला यॉर्करवर बाद करू शकतो तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तयार असल्याचंही आरपी सिंग म्हणाला होता. बुमराह एकदिवसीय क्रिकेटमध्ये आयसीसी रँकिंगमध्ये नंबर एकवर असून एक वर्षापूर्वी कसोटी पदार्पण केलं होतं. यात त्यानं 12 कसोटी खेळल्या असून एका डावात 5 विकेट घेण्याची कामगिरी 5 वेळा केली आहे. त्यानं गेल्या दोन डावात 11 विकेट तर फक्त 23 धावांमध्ये घेतल्या आहेत. ‘अमित शहांच्या उपस्थितीत 2 आमदार आणि एक खासदार भाजपमध्ये करणार प्रवेश’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.