IND vs WI इतिहास रचण्यापूर्वी बुमराहच्या नावावर नकोसा विक्रम!

IND vs WI इतिहास रचण्यापूर्वी बुमराहच्या नावावर नकोसा विक्रम!

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं विंडिजविरुद्ध हॅट्ट्रिक केली असून कसोटीत अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

  • Share this:

जमैका, 01 सप्टेंबर : विंडीजविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहनं आपल्या गोलंदाजीनं सर्वांची मनं जिंकली. त्यानं विंडीजच्या 6 फलंदाजांना तंबूत धाडताना पहिल्या हॅटट्रिकची नोंद केली. यासह कसोटीत हॅट्ट्रिक करणारा बुमराह भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्यानं 9.1 षटकांत तीन निर्धाव षटकं टाकली. यात त्याने 16 धावा देत 6 गडी बाद केले. बुमराहनं या कामगिरीसह इतिहास रचला. मात्र याआधी त्यानं एक नकोसा विक्रमही त्याच्या नावावर झाला. बुमराहशिवाय मोहम्मद शमीच्या नावावरही असा विक्रम आहे.

गोलंदाजीत कमाल करणाऱ्या बुमराहला फलंदाजीत मात्र त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. त्याला खातेही उघडता आलं नाही. त्याच्यासोबत शमीलासुद्धा खातं उघडता आलं नाही.

बुमराहनं दुसऱ्या कसोटी सामन्यात चार चेंडू खेळले. यात त्याला एकही धाव काढता आली नाही. भारताकडून कसोटीत सर्वाधिक वेळा शून्य धावांवर बाद होणाऱ्यांच्या यादीत बुमराहच्या नावाचा समावेश झाला आहे.

फलंदाजी करताना बुमराहला पाच वेळा खातंही उघडता आलं नाही. यामध्ये चारवेळा तो नाबाद राहिला. या यादीत मोहम्मद शमी पहिल्या स्थानावर आहे. जमैकातील कसोटीत त्याला एकही धाव काढता आली नाही. शमीने सहावेळा शून्य धावा केल्या आहेत. या दोघांशिवाय बी चंद्रशेखर, रंगाचारी, रमाकांत देसाई, अजित आगरकर, मुनाफ पटेल यांनाही पाचवेळा खातं उघडता आलं नव्हतं.

VIDEO :...जर सेनासोबत नसेल तर भाजपला इतक्या जागा, आठवलेंचं भाकीत

Published by: Suraj Yadav
First published: September 1, 2019, 11:34 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading