जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / India vs West Indies 2nd Test : बुमराहच्या हॅट्ट्रिकचा खरा हिरो ठरला विराट! एका निर्णयानं घडला इतिहास

India vs West Indies 2nd Test : बुमराहच्या हॅट्ट्रिकचा खरा हिरो ठरला विराट! एका निर्णयानं घडला इतिहास

कसोटी क्रिकेटमध्ये जास्त सामने बुमराहला खेळता आलेले नाही त्यामुळं 2021 टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी बुमराह कसोटीमधून निवृत्ती घेऊ शकतो.

कसोटी क्रिकेटमध्ये जास्त सामने बुमराहला खेळता आलेले नाही त्यामुळं 2021 टी-20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी बुमराह कसोटीमधून निवृत्ती घेऊ शकतो.

विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहनं 16 धावा देत विंडीजचे 6 फलंदाज बाद केले.

  • -MIN READ
  • Last Updated :

जमैका, 01 सप्टेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय मालिकेत भारताचे पारडे जड दिसत आहे. हनुमा विहारीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं 416 पर्यंत मजल मारली. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विंडिजच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा बुमराह तिसरा गोलंदाज ठरला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी बुमराहनं 9व्या ओव्हरमध्ये ही कमाल केली. बुमराहनं आपल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर डॅरेन ब्राव्हो (4), तिसऱ्या चेंडूवर शाहमार ब्रूक्स (0) आणि चौथ्या चेंडूवर रोस्टन चेज (0) ला बाद करत ऐतिहासिक हॅट्रीक घेण्याची कामगिरी केली. मात्र, बुमराहच्या या हॅ हॅट्ट्रिकमध्ये सर्वात मोठे योगदान आहे ते कर्णधार विराट कोहलीचे. त्याचे कारण म्हणजे बुमराहला हॅट्ट्रिक विकेट ही डीआरएसनं मिळाली. मात्र, या विकेटचे खरे श्रेय जाते ते विराट कोहलीला. कारण बुमहारनं डीआरएस घेण्यास नकार दिला होता. बुमराहनं या विकेटसाठी अपीलही केले नव्हते. विराटनं सामन्यानंतर बुमराहची मुलाखत घेतली. यावेळी बुमराहनं, “मला वाटत नव्हते ती विकेट मिळेल कारण माझ्या मते चेंडू बॅटला लागला होता. मात्र कर्णधारानं योग्य निर्णय घेत डीआरएस घेतला ज्यामुळं मला हॅट्ट्रिक मिळाली. त्यामुळं माझ्या हॅट्ट्रिकचे खरे श्रेय विराटला जाते”, असे सांगितले.

जाहिरात

वाचा- बुम बुम बुमराह! कसोटीत हॅट्ट्रिक घेणारा तिसरा भारतीय, पहिले दोन कोण? असे मिळाले दोन विकेट भारतानं दिलेल्या 416 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या डावात बुमराहनं 9व्या ओव्हरमध्ये दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर बुमराहला विकेट मिळाली. दुसऱ्या चेंडूवर डॅरेन ब्राव्होला राहुलच्या हाती झेल देत बाद केले. तर तिसऱ्या चेंडूवर ब्रुक्सला एलबीडब्लू करत बाद केले. चौथा चेंडू बुमराहसाठी हॅट्ट्रिक चेंडू होता. बुमरहाच्या हॅट्ट्रिकचा खरा हिरो होता विराट चौथा चेंडू रोस्टन चेजच्या पायाला लागला. मात्र अम्पायरनं नाबाद दिले, बुमराहनेही जोरात अपील केले नाही. त्याला वाटले हा चेंडू बॅटवर लागला आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीच्या डोक्यात वेगळेच विचार होता. त्यानं डीआरएस घेण्याची मागणी केली. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी चेजला बाद घोषित केले. वाचा- शमीमुळे बदललं बुमराहचं आयुष्य, धोनीनं केली होती मोठी भविष्यवाणी! कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणार तिसरा गोलंदाज वेस्ट इंडिज विरोधात बुमराहनं कारकिर्दीतील पहिली हॅट्ट्रिक केली. बुमराहनं 9.1 षटके गोलंदाजी करताना 3 षटके निर्धाव टाकली. त्यानं 16 धावा देत विंडीजचे 6 फलंदाज तंबूत धाडले. बुमराहच्या आधी भारताकडून हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी अशी कामगिरी केली आहे. हरभजन सिंगने 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर इरफान पठाणने पाकिस्तानविरुद्ध 2006 मध्ये अशी कामगिरी केली होती. वाचा- IND vs WI इतिहास रचण्यापूर्वी बुमराहच्या नावावर नकोसा विक्रम! VIDEO: महिला बस चालकाचा इंगा! मुलींना छेडणाऱ्याला फिल्मी स्टाईलनं मारहाण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात