जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SL : श्रीलंकाविरुद्ध भारतीय संघात होणार 3 मोठे बदल! या खेळाडूंना मिळणार प्लेयिंग इलेव्हनमध्ये जागा

IND vs SL : श्रीलंकाविरुद्ध भारतीय संघात होणार 3 मोठे बदल! या खेळाडूंना मिळणार प्लेयिंग इलेव्हनमध्ये जागा

IND vs SL : श्रीलंकाविरुद्ध भारतीय संघात होणार 3 मोठे बदल! या खेळाडूंना मिळणार प्लेयिंग इलेव्हनमध्ये जागा

भारतीय संघ आज नववर्षातील पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. गुवाहटीच्या बारसापार मैदानावर हा सामना होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

गुवाहटी, 05 जानेवारी : भारतीय संघ आज नववर्षातील पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. गुवाहटीच्या बारसापार मैदानावर हा सामना होणार आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघात तीन बदल करणे निश्चित आहे. या दौऱ्यात सलामीवीर  रोहित शर्मा आणि जलद गोलंदाज मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर, जसप्रीत बुमराह बऱ्याच महिन्यांनंतर कमबॅक करणार आहे. आज संध्याकाळी सात वाजता भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना खेळला जाईल, त्यामुळं दोन्ही संघ विजयी सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेले टीम इंडियाचे तीन खेळाडू या मालिकेत नाहीत. अशा परिस्थितीत, आजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल निश्चित दिसतील. वाचा- अश्विनचा रेकॉर्ड तोडण्यासाठी भिडणार बुमराह आणि चहल, कोण मारणार बाजी? टीम इंडियामध्ये तीन बदल निश्चित आहेत या मालिकेसाठी सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळं दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला शिखर धवन कमबॅक करू शकतो. तर, भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर वेगवान गोलंदाजीत जखमी झाले आहेत. त्यामुळं गोलंदाजीमध्ये नवदीप सैनीला जागा मिळू शकते. वाचा- पंत आणि चहलने प्रशिक्षकालाच लगावले ठोसे, VIDEO VIRAL अशी असेल प्लेयिंग इलेव्हन आजच्या सामन्यात भारतीय संघात सलामीला मोठा दिसेल. दुखापतग्रस्त शिखर धवन रोहित शर्माच्या जागी केएल राहुलच्यासोबत ओपनिंग करेल. तर, वेगवान गोलंदाजीत अनुभवी स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह बऱ्याच दिवसांनी कमबॅक करत आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला बुमराह हा टीम इंडियाच्या गोलंदाजीचा महत्त्वाचा भाग आहे. दीपक चाहरच्या जागी तरुण नवदीप सैनीला संधी मिळाली आहे. हा एक बदल आहे जो भविष्यातील गोलंदाज मानला जात आहे. वाचा- INDvsSL : टीम इंडियात कमबॅकसाठी दोन स्टार खेळाडू सज्ज, ‘या’ ठिकाणी पाहा LIVE भारताचा संभाव्य संघ-शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात