गुवाहटी, 05 जानेवारी : नव्या वर्षाच्या सुरुवातीला भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. यातील पहिला सामना रविवारी होणार आहे. गुवाहटीतील बार्सापारा स्टेडियममध्ये पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताचा हिटमॅन रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सलामीवीर शिखर धवन यांच्याकडे लक्ष असणार आहे. दोघेही दुखापतीनंतर पुनरागमन करण्यास सज्ज झाले आहेत. भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असणार आहे. दुखापतीमुळे तो काही काळ क्रिकेटपासून दूर होता. तर शिखर धवन वर्ल्ड कपमध्ये झालेल्या दुखापतीनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माला विश्रांती दिल्यानं आता केएल राहुलला ही एक चांगली संधी असणार आहे. वाचा : पॅडमध्ये अडकली बॅट अन् उडाली दांडी! क्रिकेटमधला हा मजेशीर VIDEO एकदा पाहाच भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी 20 सामना रविवार दिनांक 5 जानेवारी 2020 ला गुवाहटी येथे होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवरून star sports होणार आहे. याशिवाय लाइव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर (Hotstar) पाहता येईल. लंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन वाचा : भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या गोलंदाजानं घेतली निवृत्ती!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







