गुवाहटी, 05 जानेवारी : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरूद्ध टी -20 मालिकेसह वर्षाची सुरूवात करणार आहे. आजपासून भारत-श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी -20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनचा एक विक्रम धोक्यात आहे. हा विक्रम तोडण्यासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांच्यात स्पर्धा सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेविरूद्ध टी -20 मालिका गुवाहाटीमध्ये सुरू होणार आहे. यावर्षीचा भारताचा हा पहिला सामना असेल. तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्या सामन्यात विजय मिळवत नवी वर्षाची चांगली सुरुवात करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. वाचा- CAAवर पहिल्यांदाच बोलला कॅप्टन कोहली, सामन्याआधी केले मोठे वक्तव्य मोडला जाऊ शकतो अश्विनचा विक्रम भारताकडून टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अद्याप फिरकीपटू आर अश्विनच्या नावावर आहे. अश्विनच्या नावावर 52 टी -20 विकेट घेण्याचा विक्रम आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलने त्याची बरोबरी केली आहे पण त्याला मागे टाकता आले नाही. चहलने अवघ्या 36 टी -20 सामन्यांत 52 विकेट घेतल्या आहेत. अश्विननं हा विक्रम 46 सामन्यात केला आहे. वाचा- पॅडमध्ये अडकली बॅट अन् उडाली दांडी! क्रिकेटमधला हा मजेशीर VIDEO एकदा पाहाच कोण मोडणार अश्विनचा विक्रम? सध्या युझवेंद्र चहल आर अश्विनचा विक्रम मोडण्यास सर्वात जवळ आहे. चहलनं 52 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एका विकेट घेत चहल टी -20 विकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा फलंदाज ठरले. तर, महिन्यानंतर कमबॅक करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावावर 51 विकेट आहेत. त्यामुळं बुमराह आणि चहल यांच्यात हा रेकॉर्ड तोडण्यासाठी अटीतटीची लढत असणार आहे. वाचा- पोट सुटलेल्या क्रिकेटपटूंचा कापणार पगार! क्रिकेट बोर्डानं काढला अजब फतवा श्रीलंकेविरुद्ध मालिका 05 जानेवारी: पहिला टी-20 (गुवाहाटी) 07 जानेवारी: दुसरा टी-20 (इंदूर) 09 जानेवारी: तिसरा टी-20 (पुणे) वाचा- टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, न्यूझीलंड दौऱ्याआधी स्टार फलंदाजाला गंभीर दुखापत भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







