पंत आणि चहलने प्रशिक्षकालाच लगावले ठोसे, VIDEO VIRAL

पंत आणि चहलने प्रशिक्षकालाच लगावले ठोसे, VIDEO VIRAL

भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि गोलंदाज युझवेंद्र चहल यांनी प्रशिक्षकालाच ठोसे मारल्याचा व्हिडिओ पंतनेच शेअऱ केला आहे.

  • Share this:

गुवाहटी, 05 जानेवारी : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी20 सामन्यांची मालिका आजपासून सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कसून सराव केला. यात मैदानावरील सराव आणि जीममध्येही घाम गाळला. दरम्यान, भारताच्या खेळाडूंचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ते आपल्या प्रशिक्षकालाच मजेत मार देत असल्याचं दिसत आहे. ऋषभ पंतने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

पंतने व्हिडिओ शेअर करताना म्हटलं की, वर्कआउट करत असताना आणि वर्कआउट झाल्यानंतर. दोन भागाता असलेल्या या व्हिडिओमध्ये पंतला प्रशिक्षक काही टीप्स आणि ट्रेनिंग देताना दिसतात.

एकाच क्लिपमध्ये असलेल्या दुसऱ्या व्हिडिओत भारताचा गोलंदाज युझवेंद्र चहल बॉक्सिंगचा सराव करताना दिसतो. त्यात अचानक ऋषभ पंत येतो आणि तो प्रशिक्षकांना पकडतो. त्यानंतर चहलने त्यांना ठोसे मारायला सुरुवात केली. तेव्हा संजू सॅमसन त्या ठिकाणी येतो. चहल फक्त प्रशिक्षकांना ठोसे मारून थांबत नाही तर पंतलाही एकदोन ठोसे मारतो.

सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लंकेविरुद्धच्या मालिकेसाठी पंत आणि सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी 20 सामना रविवार दिनांक 5 जानेवारी 2020 ला गुवाहटी येथे होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवरून star sports होणार आहे. याशिवाय लाइव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर (Hotstar) पाहता येईल.

लंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन

भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या गोलंदाजानं घेतली निवृत्ती!

Published by: Suraj Yadav
First published: January 5, 2020, 11:48 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading