स्टीव्ह स्मिथने 45 मिनिटानंतर घेतली पहिली धाव, स्टेडियममध्ये चाहत्यांनी केला जल्लोष; पाहा VIDEO

स्टीव्ह स्मिथने 45 मिनिटानंतर घेतली पहिली धाव, स्टेडियममध्ये चाहत्यांनी केला जल्लोष; पाहा VIDEO

कोणताही विक्रम नाही तरीही स्मिथने फक्त पहिली धाव घेतली म्हणून प्रेक्षकांनी जल्लोष केला तर गोलंदाजाने केलं अभिनंदन.

  • Share this:

सिडनी, 03 डिसेंबर :  ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith)हा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. वर्ल्ड कपनंतर अॅशेस मालिकेत पाडलेला धावांचा पाऊस पाहिल्यानंतर धावा काढण्यासाठी त्याला फारसं झगडावं लागत नाही हेच दिसतं. पण ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील एका सामन्यात त्याला खूपच कष्ट करावे लागले. त्याच्या या खेळीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आतापर्यंत कोणत्याच खेळाडूने पहिली धाव घेतल्यानंतर  जल्लोष करण्यात आला नव्हता तेवढा स्मिथने खातं उघडल्यावर करण्यात आला. त्याने एक धाव काढण्यासाठी एक दोन नाही तर तब्बल 39 चेंडू घेतले.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात आहे. या  सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथची अक्षरश: कसोटीच सुरु आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर धावांसाठी त्याला धडपड करावी लागत आहे. फलंदाजीला मैदानात आलेल्या स्मिथला खातं उघडण्यासाठी 45 मिनिटे वाट बघायला लागली. 39 व्या चेंडूवर त्याने पहिली धाव घेतली.

स्टीव्ह स्मिथने न्यूझीलंडच्या नील वॅगनरच्या गोलंदाजीवर पहिली धाव काढली. स्टीव्ह स्मिथने त्याचं खातं उघडताच प्रेक्षकांनी शतक झाल्यानंतर जसा जल्लोष करतात तसा केला. प्रेक्षकांनी केलेला जल्लोष कमी होता म्हणूनच की काय गोलंदाज वॅगनरनेसुद्धा स्मिथच्या पाठीवर थाप मारत अभिनंदन केलं.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण सलामीवीर जो बर्न्स फक्त 18 धावा काढून बाद झाला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरसुद्धा 45 धावा काढून बाद झाला. तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 बाद 35 अशी झाली होती. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या स्मिथ आणि मार्नस लॅब्यूशेनने डाव सावरला. दोघांनी दीडशतकी भागिदारी केली. स्टीव्ह स्मिथ 63 धावांवर बाद झाला. तर मार्नस लॅब्युशेन 128 धावांवर खेळत आहे.

भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या खेळाडूला दणका, एका वर्षाची बंदी

Published by: Suraj Yadav
First published: January 3, 2020, 1:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading