क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर, Jioवर मोफत पाहू शकता India vs South Africa T20 सामना

सायंकाळी 7 वाजता धर्मशाला मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला टी-20 सामना होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2019 05:49 PM IST

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर, Jioवर मोफत पाहू शकता India vs South Africa T20 सामना

धर्मशाला, 15 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पहिला टी-20 सामना होणार आहे. सायंकाळी 7 वाजता धर्मशाला मैदानावर हा सामना सुरू होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्यानंतर घरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे.

दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे जर तुम्ही रविवारीही कामात असाल तर तुम्ही सामना तुमच्या मोबाईलवर मोफत पाहू शकता. जर तुम्ही Jio ग्राहक असाल आणि तुमच्याकडे Jio TV हे अॅप असेल तर तुम्ही फोनवर हा सामना मोफत पाहू शकता.

एवढेच नाही तर लाईव्ह सामन्यात Jio Cricket Play Along गेम खेळून बक्षिसही जिंकू शकता. क्रिकेट चाहते Jio TVवर मोफत तीन टी-20 आणि तीन कसोटी सामने पाहू शकतात. सामना लाईव्ह पाहण्यासाठी तुमच्याकडे फक्त प्राईम मेंबरशिप असणे गरजेचे आहे.

वाचा-पहिल्या टी-20 सामन्यात पाऊस घालणार का खोडा? असे आहे सध्याचे हवामान

Loading...

सामना लाईव्ह पाहण्यासाठी करा या गोष्टी

सामना लाईव्ह पाहण्यासाठी गुगल प्ले स्टोरवरून Jio TV अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर आपल्या Jio नंबरने लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर Jio TV अॅपमध्ये Jio Cricket HD चॅनल दिसतील. या चॅनलवर तुम्ही भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील लाईव्ह सामना पाहू शकता.

चार वर्षांपूर्वीच्या पराभवाचा काढणार वचपा

तब्बल चार वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघ भिडणार आहे. 2015मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात आली होती, तेव्हा भारतीय संघाला मायदेशात 2-0नं पराभव सहन करावा लागला होता. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. टी20 आणि कसोटीसाठी भारताचा कर्णधार म्हणून कोहलीच असणार आहे तर दक्षिण आफ्रिका मात्र दोन्ही मालिकेत वेगवेगळ्या कर्णधारांकडे नेतृत्व सोपवणार आहे. टी20 मालिकेत क्विंटन डी कॉक तर कसोटीसाठी फाफ डुप्लेसीकडे कर्णधारपद असणार आहे. आफ्रिकेच्या संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. वर्ल्ड कपमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या या संघाला भारत दौऱ्यात कामगिरी उंचावण्याचं आव्हान असणार आहे. दुसरीकडं भारतानं विंड़ीजविरुद्ध निर्विवाद यश मिळवलं आहे. यशाची ही घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.

वाचा-युवा ब्रिगेड पहिल्या टी-20साठी सज्ज! 'या' 11 खेळाडूंना विराट देणार संघात जागा

टी 20 साठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी.

वाचा-क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ते पे सत्ता! सलग 7 चेंडूत लगावले 7 सिक्स!

काही कळण्याआधीच कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2019 05:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...