Home /News /sport /

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील 'तो' सामना फिक्सच, दिल्ली पोलिसांचा धक्कादायक खुलासा

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील 'तो' सामना फिक्सच, दिल्ली पोलिसांचा धक्कादायक खुलासा

2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारत दौरा केला. या दौऱ्यादरम्यान काही सामने फिक्स केल्याचा आरोप करण्यात आला होता.

    नवी दिल्ली, 24 मे : क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणारा बूकी संजीव चावलाचे प्रत्यार्पण केल्यानंतर दिल्ली पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. संजीव चावलावर मॅच फिक्सिंग रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता. हे फिक्सिंग प्रकरण दिल्ली पोलिसांनी 2000 मध्ये उघडकीस आणलं होतं. दरम्यान आता संजीव चावलावर नवीन आरोप पत्र दाखल करण्यात आली आहे, या चौकशी दरम्यान संजीव चावलानं काही धक्कादायक खुलासे केले. संजीव चावला दाऊद गँगसाठी 1990 च्या दशकात सट्टेबाज बनला. लंडनमध्ये वास्तव्य करणाऱ्या संजीव चावलाला गुरुवारी भारतात आणलं जाईल. इंग्लंडसोबत 1992 मध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार भारतात आणला जाणारा संजीव हा दुसरा व्यक्ती असेल. 2000 मध्ये क्रीडा जगताला हादरवून टाकणाऱा मॅच फिक्सिंगचा प्रकार घडला होता. त्यावेळी दिल्ली पोलिस आयुक्त असलेल्या अजय राज शर्मा यांनी म्हटलं की, चावलाला 19 वर्षांनी भारतात आणलं जाणार आहे. त्याच्या चौकशीत क्रिकेट जगतातील अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. वाचा-VIDEO : लॉकडाऊनमध्ये रंगला क्रिकेटचा सामना, पाहा कोरोनाच्या संकटात कसे खेळले दरम्यान दिल्ली पोलिसांच्या आरोप पत्रात, “तपासणी दरम्यान नोंदविलेल्या साक्षीदारांच्या विधानांच्या आधारे, जप्त केलेल्या ऑडिओ व व्हिडीओ कॅसेटमधील आरोपींमधील संभाषण, सीएफएसएल अहवाल आणि इतर माहितीपट व तोंडी पुरावा यांच्या आधारे, काही सामने फिक्स झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे, असे नमुद करण्यात आले आहे. यामध्ये 2000मध्ये मुंबई येथील पहिला कसोटी सामना आणि कोचीन येथे पहिला एकदिवसीय सामना फिक्स करण्यात आला होता. आरोपीविरोधात कलम 420 आणि 120 बी नुसार दंडनीय गुन्हे दाख करण्यात आल्याचेही आरोपपत्रात म्हटलं आहे. वाचा-'माझ्या निवडीसाठी लाच मागितली गेली', विराटच्या आरोपामुळे क्रिकेट विश्वात खबळबळ 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेने केला होता भारत दौरा 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारत दौरा केला. संजीव चावला आणि क्रोन्जेच्या मदतीने त्या दौर्‍यादरम्यान सामना फिक्स करण्यात आला होता. त्यानंतर मालिकेत 5 एकदिवसीय सामने खेळले गेले. वाचा-भारतीय खेळाडूचा धक्कादायक खुलासा, लग्नानंतरही सोबत आहेत 5 गर्लफ्रेण्ड कारण... दिल्लीमध्ये व्यवसायिक होता चावला न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, चावला हा एक व्यवसायिक होता. 1996 मध्ये तो बिझिनेस व्हिसावर लंडनला गेला होता. तर, 2000 मध्ये त्यांचा भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आला. 2005 मध्ये त्याला ब्रिटनचा पासपोर्ट मिळाला होता आणि आता तो ब्रिटीश नागरिक झाला. फेब्रुवारी 2000 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएसोबत मॅच फिक्स केल्याचे समोर आले होते.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या