मुंबई, 22 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगातील अनेक देशांत झाला. यामुळे देशांमध्ये लॉकडाऊन कऱण्यात आलं. गेल्या चार महिन्यांमध्ये बऱ्याच देशांत लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यातही दोन महिने झालं जगातील क्रिडा स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, तब्बल दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानावर सामना रंगला. सेंट व्हिंसेंट अँड ग्रेनाडिन्स क्रिकेट असोसिएशनने विन्सी प्रीमिअर लीगचे आयोजन केले आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत ग्रेनाडाइन डाव्हर्स आणि सॉल्ट पोंड ब्रेकर्स यांच्यात पहिला सामना झाला. या सामन्यात चेंडू चमकवण्यासाठी थूंकीचा वापर कऱण्यास बंदी होती. विन्सी प्रीमिअर लीग 22 ते 31 मे 2020 या काळात खेळवण्यात येणार आहे. टी10 लीगचे सामने कॅरेबियन बेटावर असलेल्या आर्नोस व्हॅली स्पोर्टिंग कॉम्प्लेक्सवर होणार आहेत. या स्पर्धेत 6 संघ असून आयपीएल आणि कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर हे सामने होणार आहेत.
1st Match;
— FanCode (@FanCode) May 22, 2020
1st Innings &
1st Hat trick!
What a start to the #VincyPremierLeague !
Watch all the action LIVE & EXCLUSIVE on #FanCode: https://t.co/NhBMDBKbrf#cricket #T10 #livecricket #CricketIsBack #VPLonFanCodeLIVE #CricketonFanCode @VPLT10 pic.twitter.com/KCMRIpzzjl
पहिल्याच सामन्यात ग्रेनाडाइन डाव्हर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात सर्वबाद 68 धावा केल्या. शेम ब्राऊनने 14 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह 24 धावा केल्या. त्याच्याशिवाय रोमॅनो पिएरेने 14 धावा काढल्या. इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. सॉल्ट पोंड ब्रेकर्सच्या वेस्रीक स्टॉघनं 1 षटकात 7 धावांमध्ये 3 गडी बाद केले. तर कर्णधार सुनील अॅम्ब्रीस, डॉनवेल हेक्टर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. स्टॉघनं पहिली हॅट्ट्रिकही घेतली. ग्रेनाडाइन डाव्हर्सने दिलेल्या 68 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सॉल्ट ब्रेकर्सची सुरुवात खराब झाली. डाव्हर्सच्या जिरोन विली याने दोन षटकात ब्रेकर्सचे 4 गडी तंबूत धाडले. त्यानंतर उर्नेल थॉमसनं फटकेबाजी केल्यामुळे ब्रेकर्सनी 3 गडी राखून सामना जिंकला. हे वाचा : ‘माझ्या निवडीसाठी लाच मागितली गेली’, विराटच्या आरोपामुळे क्रिकेट विश्वात खबळबळ

)







