Home /News /sport /

'माझ्या निवडीसाठी लाच मागितली गेली', विराटच्या आरोपामुळे क्रिकेट विश्वात खबळबळ

'माझ्या निवडीसाठी लाच मागितली गेली', विराटच्या आरोपामुळे क्रिकेट विश्वात खबळबळ

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली याने केलेल्या एका गौप्यस्फोटोमुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

    नवी दिल्ली, 21 मे : लॉकडाऊनमुळे इतर क्षेत्रांवर जसा परिणाम झाला तसाच परिणाम क्रिकेटवरही झाला. आयपीएलसारखी भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा रद्द करावी लागली. लॉकडाऊनमुळे घरात अडकलेल्या क्रिकेटपटू सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांसोबत संवाद साधत आहेत. मात्र अशातच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली याने केलेल्या एका गौप्यस्फोटोमुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. सुनिल छेत्री यांच्यासोबत इंस्टाग्रामवरून संवाद साधत असताना विराटने त्याच्या पदार्पणाबाबत धक्कादायक दावा केला आहे. 'मी जिथं जन्माला आलो, त्या दिल्लीत क्रिकेटमध्ये अनेकदा अशा गोष्टी होतात, ज्या योग्य नसतात. लोक निवड प्रक्रियेबाबत नियमांचं पालन करत नसल्याचं दिसून येतं. मी राज्यपातळीवर खेळत असताना त्यांनी माझ्या वडिलांनी म्हटलं की विराटमध्ये निवड होण्यासारखी क्षमता आहे. मात्र थोडीफार लाच दिली तर त्याचा क्रिकेटमधील एण्ट्रीचा रस्ता सोपा होईल,' असा दावा विराट कोहली याने केला आहे. याबाबत 'अमर उजाला'ने वृत्त दिलं आहे. विराट पुढे म्हणाला की, 'माझे वडील मोठ्या मेहनतीने वकील झाले होते. त्यांनी लाच मागणाऱ्यांना सरळ-सरळ सांगितलं की माझा मुलगा गुणवत्तेच्या आधारेच खेळेल. त्यानंतर संघात माझी निवड होई शकली नाही. त्यामुळे मी खूप रडलो. पूर्णपणे कोसळले होतो. मात्र त्याच प्रसंगाने मला खूप काही शिकवलं. मला याची जाणीव होती की मला असामान्य बनण्यासाठी अजून खूप मेहनत घ्यावी लागेल. माझ्या वडिलांनी प्रत्यक्ष उदाहरण देवून मला योग्य मार्ग दाखवला.' दरम्यान, विराट कोहल्याच्या या खुलाश्यानंतर आता पुन्हा एकदा भारतातील क्रिकेट व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याधी भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग यानेदेखील थेट समालोचन करतानाच भारतात क्रिकेट खेळताना कशा प्रकारे सर्रासपणे वय लपवलं जातं, याबाबत भाष्य केलं होतं. त्यामुळे आगामी काळात याबाबत काही कडक नियम केले जातात का, हे पाहावं लागेल. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Virat kohli

    पुढील बातम्या