चांगलं खेळा नाही तर संघाबाहेर बसा! कॅप्टन कोहलीनं 'या' खेळाडूंना दिली सक्त ताकिद

चांगलं खेळा नाही तर संघाबाहेर बसा! कॅप्टन कोहलीनं 'या' खेळाडूंना दिली सक्त ताकिद

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात केली आहे.

  • Share this:

धर्मशाला, 16 सप्टेंबर : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान विराटनं नुकतेच काही खेळाडूंना थेट इशारा दिला आहे. कॅप्टन कोहलीनं खेळाडूंना संघात जागा तयार करायची असेल तर, चांगला खेळ करा अशा इशारा दिला आहे. कारण युवा खेळाडूंना केवळ चार ते पाच खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळं स्वत:ला सिध्द करण्यासाठी खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

टीम इंडियासाठी 2008मध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीनं खुद्द स्वत:चे उदाहरण देत युवा खेळाडूंना प्रोत्साहन दिले. विराटनं, "आपल्याला आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या काळात एवढ्या संधी मिळतील अशी अपेक्षा नव्हती, पण मला मिळालेल्या संधीचं मी सोनं केलं, युवा खेळाडूंनी अशीच खेळी करणे अपेक्षित आहे", असे मत व्यक्त केले.

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची तयारी सुरू

विराट कोहलीनं नुकतेच, "टी-20 वर्ल्ड कपसाठी आता केवळ 30 सामने आमच्याकडे आहे. संघाला काय करायचे आहे हे आमच्या डोक्यात निश्चित आहे. त्यामुळं युवा खेळांडूनी कंबर कसण्याची गरज आहे. संधीचं सोनं करण्याची खेळाडूंची तयारी हवी. संघाची जी मानिसकता आहे तीच या खेळाडूंची हवी, हे सर्वांसाठी फायद्याचे आहे", असे मत व्यक्त केले.

वाचा-आमचा वेळ फुकट घालवण्याचा तुम्हाला काय हक्क, सामना रद्द झाल्यानंतर BCCIची शाळा

टेस्ट चॅम्पियनशीपकडेही संघाचे लक्ष

टी-20 वर्ल्ड कपशिवाय संघाचे लक्ष्य येणाऱ्या ऑस्ट्रेलियात दौऱ्य़ाकडेही आहे. तसेच, आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये चांगली कामगिरी करण्याचे दडपणही संघावर आहे. सध्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी विराट कोहलीनं युवा खेळाडूंना संधी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे.

वाचा-लाईव्ह सामन्यात झाली मोठी गडबड! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा प्रकार

या युवा खेळाडूंकडे असणार विशेष लक्ष

वेस्ट इंडिज दौऱ्यात चांगली कामगिरी केल्यानंतर निवड समितीनं श्रेयस अय्यर आणि मनीष पांडे या खेळाडूंना दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या दौऱ्यातही संघात स्थान दिले. त्यामुळं या दोन खेळाडूंवर विशेष लक्ष असणार आहे. विराट कोहलीनं या संदर्भात, "आमचे लक्ष सध्या कसोटी आणि टी-20 सामन्यांवर आहे. युवा खेळाडूंवर वेळोवेळी जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपआधी संघाला या खेळाडूंकडून जास्त अपेक्षा आहे. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर आणि नवदीप सैनी यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

वाचा-पावसामुळं चाहत्यांचा रविवार गेला वाया, पहिला टी-20 सामना रद्द!

SPECIAL REPORT: मराठवाड्याचा गड पुन्हा राखण्यासाठी आदित्य ठाकरे लढणार उस्मानाबादमधून निवडणूक?

First published: September 15, 2019, 11:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading