नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंडदरम्यान (IND vs NZ) तीन टी20 सिरीजमध्ये भारतीय संघाने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यापैकीच एक नाव म्हणजे आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करणारा व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer). सध्या तो चांगल्या फार्ममध्ये असून एका खास गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. आयपीएलमध्ये (IPL 2021) कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्वतःकडे सर्वांचे लक्ष वेधत न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या ताफ्यात आपले स्थान पक्के केले. दरम्यान, त्याची एक इच्छा चर्चेत आली आहे. ती म्हणजे WWE सुपरस्टार अंडरटेकरकडून त्याला खास गिफ्ट हवं आहे. बीसीसीआयने अय्यरच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने आपली इच्छा व्यक्त केली आहे. व्यंकटेशचा बालपणीचा हिरो क्रिकेटर नसून तो WWE चा फॅन आहे. WWE सुपरस्टार अंडरटेकर हा त्याचा हिरो आहे. व्यंकटेशने मुलाखतीत सांगितले की तो अंडरटरचा खूप मोठा चाहता आहे आणि अंडरटेकरने त्याचा ब्लॅक बेल्ट आपल्याला गिफ्ट द्यावा अशी त्याची इच्छा आहे.
Of bond with buddy @Avesh_6 👌
— BCCI (@BCCI) November 17, 2021
Warm welcome from @ImRo45, Rahul Dravid & @RishabhPant17 👏
Special request for WWE's The Undertaker 😎
@ivenkyiyer2512 discusses it all with @28anand in this special feature. 👍 #TeamIndia #INDvNZ
Full interview 🎥 🔽 https://t.co/xPiTo2h1NL pic.twitter.com/hFbxv23wy7
अष्टपैलू खेळाच्या जोरावर संधी
एक अष्टपैलू खेळाडू म्हणून व्यंकटेश अय्यरला भारतीय टी20 संघात संधी मिळाली आहे. वेगवान धावा करण्याबरोबरच विकेट घेण्यातही व्यंकटेश अय्यर माहिर आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात अय्यरने 10 सामन्यात 370 धावा केल्या होत्या आणि 3 विकेटही त्याने घेतल्या होत्या. ‘द डेडमॅन’ म्हणून ओळखल्या जाणार्या अंडरटेकरने जून 2020 मध्ये इन-रिंग अॅक्शनमधून निवृत्ती घेतली आणि गेल्या वर्षी सर्व्हायव्हर मालिकेत त्याच्या निरोपात भाग घेतला. तेव्हापासून तो WWE वर नाही. अंडरटेकर अलीकडेच सौदी अरेबियामध्ये होता, परंतु WWE क्राउन ज्वेलमध्ये दिसला नाही. त्याच्या पुढच्या टेलिव्हिजन हजेरीबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही.