मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ T20I Series मध्येही युझवेंद्र चहल बेंचवर, चहलच्या स्वप्नांना पुन्हा तडा?

IND vs NZ T20I Series मध्येही युझवेंद्र चहल बेंचवर, चहलच्या स्वप्नांना पुन्हा तडा?

yuzvendra chahal

yuzvendra chahal

टीम इंडियाच्या या विजयासोबत क्रिकेट जगतात लेग स्पिनर युझवेंद्र चहलची (yuzvendra chahal) देखील चर्चा जोरदार रंगली आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

जयपुर, 18 नोव्हेंबर: जयपूर येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने दिलेले 165 धावांचे लक्ष्य भारताने 19.4 षटकांत गाठत तीन सामन्यांच्या (IND vs NZ) या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाच्या या विजयासोबत क्रिकेट जगतात लेग स्पिनर युझवेंद्र चहलची (yuzvendra chahal) देखील चर्चा जोरदार रंगली आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यात नवा कर्णधार रोहित शर्माच्या निर्णयावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहिल्या टी 20 सामन्यात रोहित शर्माने टीम इंडियाच्या अशा महान खेळाडूला बाहेर ठेवले, ज्याने भारतासाठी अनेक वेळा सामने जिंकले आहेत. टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा युझवेंद्र चहल याला रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही.

युझवेंद्र चहलला संधी न मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. या सामन्यात रोहित शर्माने युझवेंद्र चहलऐवजी अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले. अक्षर पटेलबद्दल सांगायचे तर, त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4 षटकांच्या गोलंदाजीत एकही विकेट न घेता 31 धावा दिल्या.

युझवेंद्र चहलला संधी दिली असती तर न्यूझीलंडचा संघ 150 धावांपर्यंत पोहोचू शकला नसता. अक्षर पटेलला केवळ त्याच्या फलंदाजीच्या कौशल्याच्या जोरावर संधी देण्यात आली, हा निर्णय चुकीचा ठरला असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे.

2021 हे वर्ष युझवेंद्र चहलसाठी चांगले राहिले नाही. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील खराब कामगिरीमुळे चहलचा टी-20 विश्वचषक संघात समावेश करण्यात आला नव्हता. त्याच्याऐवजी राहुल चहरला प्राधान्य देण्यात आले. निवड समितीच्या या निर्णयावर अनेक दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत राहुल चहरच्या जागी चहलचा समावेश करण्यात आला. मात्र, पहिल्याच सामन्यात त्याला बेंचवर बसावे लागले.

काही दिवसांपूर्वी चहलने भारताचा नवा टी-२० कर्णधार रोहित शर्माला मोठा भाऊ म्हटले होते. चहलने एका मुलाखतीत सांगितले की, त्याचे आणि रोहितचे नाते भावासारखे आहे. रोहितची पत्नी रितिका त्याला आपला लहान भाऊ मानते.

चहलने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'रोहित भैयासोबत माझे खास नाते आहे कारण आम्ही 2011 पासून एकमेकांना ओळखतो. रोहित भैय्यामुळेच मी आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. मला संधी मिळत नव्हती आणि रोहित भैय्याने कर्णधारपद मिळताच मला संधी दिली. तो माझ्या खोलीत आला आणि म्हणाला की तू मॅच खेळत आहेस. मला आश्चर्य वाटले कारण आमच्या संघात आधीच हरभजन आणि प्रज्ञान ओझासारखे खेळाडू होते. आम्ही कधीही 3 फिरकीपटूंसोबत गेलो नाही.

First published:

Tags: New zealand, Rohit sharma, T20 league, Yuzvendra Chahal