हॅमिल्टन, 16 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात 21 फेब्रुवारीपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. दरम्याना याआधी तीन दिवसांचा सराव सामना खेळवण्यात आला होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड इलेव्हन यांच्यातील (3 day Practice Match)हा सराव सामना आज अनिर्णित राहिला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात भारतानं चांगली फलंदाजी केली. 4 विकेट गमावत भारतान 252 धावा केल्या. या सामन्यात मयंक अग्रवालने 90 चेंडूत 81 झावा केल्या. तर ऋषभ पंतने बऱ्याच काळानंतर कमबॅक करत एक चांगली खेळी केली. पंतने 65 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. पृथ्वी शॉनेही 39 धावा केल्या. वाचा- रणजी ट्रॉफीच्या इतिहासात तिसऱ्यांदा असं घडलं, इरफान पठाण म्हणाला,‘अभिमानास्पद’ मात्र दुसऱ्या डावातही शुभमन गिल (Shubman Gill) फेल झाला. याआधी पहिल्या डावात गिल एकही धाव न करता बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात 8 धावांवर गिल बाद झाला. सामना अनिर्णित घोषित करण्यात आला तेव्हा ऋद्धिमान साहा 30 आणि रविचंद्रन अश्विन 16 धावांवर खेळत होते. दरम्यान, भारत-न्यूझीलंड यांच्यात 21 फेब्रुवारी रोजी वेलिंग्टन येथे पहिला सामना होणार आहे. वाचा- विजय माल्याने RCBची खिल्ली उडवल्यानंतर म्हटलं,‘विराटला सोडा…’
Match drawn!
— BCCI (@BCCI) February 16, 2020
The players shake hands as India wrap up Day 3 with 252/4 runs in the second innings of the three-day practice game.
वाचा- ‘तुझं नशीब चांगलं आहे’, असं काय झालं की सचिनवर जळतोय गांगुली! पंतचा कमबॅक महत्त्वाचा न्यूझीलंड दौऱ्यात एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत पंतला संघात स्थान मिळाले नाही. न्यूझीलंडविरुदद्ध 5 टी-20 सामन्यात विराटनं केएल राहुलकडे विकेटकिपींगची जबाबदारी दिली होती. त्यामुळं पंतचे करिअर धोक्यात आले आहे. एवढेच नाही तर याआधी झालेल्या कसोटी मालिकेतही पंतला संधी मिळाली नव्हती. पंतने अखेरचा कसोटी सामना गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. या सामन्यात 3 डावांत पंतला केवळ 58 धावा करता आल्या होत्या. पंतची कसोटीमधील सरासरी 44.35 आहे. याआधी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतने शतकी खेळीही केली आहे. त्यामुळं न्यूझीलंडविरुद्ध पंतला संघात संधी मिळू शकते. वाचा- कसोटीमध्येही टीम इंडियाचं काही खरं नाही! 3 सलामीवीरांनी मिळून काढला 1 रन पृथ्वी शॉ की शुभमन गिल कोणाला मिळणार संधी? शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ दोघेही खूप हुशार आहेत. त्यामुळं वेलिंग्टनमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात कोणाला संधी द्यावी, याचा विचार विराटला करावा लागले. सराव सामन्यात दोन्ही फलंदाज शुन्यावर बाद झाले. सराव सामन्यात मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांनी भारताची ओपनिंग केली. तर, गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो.

)







