श्रीनगर, 15 फेब्रुवारी : रणजी ट्रॉफीमध्ये हरियाणाने जम्मू काश्मीरला आधी पराभूत झाला. मात्र सी ग्रुपमध्ये जम्मू काश्मीरने 9 सामन्यात 6 विजयांसह 39 गुण पटकावले आहेत. तर उरलेल्या तीन पैकी दोन ड्रॉ तर एका सामन्यात पराभव झाला. यासह काश्मीरने सहा वर्षांनी पुन्हा एकदा उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. 20 फेब्रुवारीपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू होणार आहेत. काश्मीरने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारताच भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाणने ही अभिमानास्पद अशी गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत फक्त तिसऱ्यांदा असं झाल्याचं त्याने सांगितलं. रणजी ट्रॉफीत पुढच्या वाटचालीसाठी इरफान पठाणने काश्मीरच्या संघाला शुभेच्छा दिल्या. चौथ्या दिवशी काश्मीरने दिलेलं 224 धावांच आव्हान 80.4 षटकांत पूर्ण करत विजय साजरला केला. हरियाणा संघाने 9 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले तर दोन पराभव आणि दोन लढती ड्रॉ राहिल्या. यामुळे त्यांचे एकूण गुण 36 राहिले. हरियाणाकडून आरपी शर्मा 75 धावांवर नाबाद राहिला. त्याआधी सीके बिश्नोई 31 धावा, आर के तेवतिया नाबाद 27 धावा, एचजे राणा 24 धावा, अंकित कुमारने 20 तर जेजे यादवने 13 धावा केल्या.
A proud moment for me and the entire Jammu Kashmir cricket team as we qualify for the knockouts! This news is very special to me as it’s the 3rd time in the history of Ranji trophy!Way to go boys... #JammuKashmir #ranjitrophy #cricket
— Irfan Pathan (@IrfanPathan) February 15, 2020
जम्मू काश्मीरकडून कर्णधार परवेझ रसूलने 33 षटकात 72 धावा देत पाच गडी बाद केले. त्याच्याशिवाय राम दयाल, आबिद मुश्ताक आणि आकिब नबी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. जम्मू काश्मीरने प्रथम फलंदाजी करताना 340 धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना हरियाणाचा संघ 291 धावांत गुंडाळला होता. पहिल्या डावातील 49 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 174 धावा यांसह काश्मीरने हरियाणाला 224 धावांचे आव्हान दिले. रणजी ट्रॉफीचा पहिला टप्पा शनिवारी पूर्ण झाला. यामध्ये गुजरात, बंगाल, कर्नाटक, सौराष्ट्र, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिसा आणि गोवा या 8 संघांनी त्यांचे स्थान पक्के केले आहे. आता उपांत्यपूर्व लढतीमध्ये सौराष्ट्र विरुद्ध आंध्र, कर्नाटक विरुद्ध जम्मू काश्मीर,बंगाल विरुद्ध ओडिसा आणि गुजरात विरुद्ध गोवा हे संघ आमने-सामने येतील. 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान या लढती होतील. वाचा : 20 किमी पायी चालण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूने मिळवलं ऑलिम्पिक तिकीट

)







