मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

भीमपराक्रम करणाऱ्या Ajaz Patelची शरद पवारांनी घेतली दखल, ट्विट करत म्हणाले...

भीमपराक्रम करणाऱ्या Ajaz Patelची शरद पवारांनी घेतली दखल, ट्विट करत म्हणाले...

Sharad Pawar

Sharad Pawar

न्यूझीलंडचा स्पिनर एजाझ पटेलने(ajaz patel) टीम इंडियाविरुद्ध सुरू असलेल्या टेस्टमध्ये एकाच इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेत ऐतिहासिक कामगिरी केली.

  • Published by:  Dhanshri Otari
मुंबई, 5 डिसेंबर: न्यूझीलंडचा स्पिनर एजाझ पटेलसाठी (Ajaz Patel) शनिवारचा दिवस सर्वात खास होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या टेस्टमध्ये त्यानं एकाच इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेतल्या. दोन बॉलर्सनंतर ही कामगिरी करणारा एजाझ हा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील तिसराच बॉलर ठरला आहे. त्याच्या या भीमपराक्रमामुळे त्याच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, त्याची राज्याचे प्रमुख नेत्याने म्हणजेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP chief Sharad Pawar congratulates Ajaz Patel on 10-wicket haul) यांनी ट्विट करत एजाझ पटेलची पाठ थोपटली आहे. एजाझच्या कामगिरीची चर्चा सगळीकडे होत असताना, आजी-माजी क्रिकेटपटूंसह चाहते त्याचे कौतुक करत आहेत. आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील त्याचे कौतुक केले. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले. 'कसोटीत एकाच डावात दहा बळी मिळवण्याची शानदार कामगिरी केल्याबद्दल एजाझ पटेलचे अभिनंदन. मुंबईत जन्मलेला आणि न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करत असताना अभिमानास्पद कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा क्रिकेटपटू.' अशा आशयाचे ट्विट पवार यांनी केले आहे. पवारांचे हे ट्विट क्रिकेट जगतासह राजकीय वर्तुळातही व्हायरल होत आहे. शरद पवार यांनी या सामन्याच्या पहिल्या दिवशी सामन्याचा आनंद लुटला होता. यावेळी त्यांच्यासह महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होत्या. पवार यांनी यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

एजाझने ऐतिहासिक कामगिरी

मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे चार गडी बाद झाले होते. हे चारही गडी फिरकीपटू एजाझ पटेलने टिपलेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील त्याने भारतीय संघाचे उर्वरित सहा गडी बाद करत सर्वच्या सर्व दहा गडी बाद करण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. यापूर्वी अशी कामगिरी इंग्लंडचे जिम लेकर व भारताच्या अनिल कुंबळे यांनी केली होती. विशेष म्हणजे एजाझ हा मूळचा मुंबईकर असून, तो न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करतो. तो आपल्या कुटुंबासह वयाच्या आठव्या वर्षी न्यूझीलंड येथे स्थायिक झाला होता.
First published:

Tags: Cricket news, NCP, Sharad pawar, Test series

पुढील बातम्या