ख्राइस्टचर्च, 01 मार्च : जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक म्हणजे रवींद्र जडेजा. जडेजानं आपल्या क्षेत्ररक्षणामुळं अनेकदा भारताच्या सामन्यांच्या रुप पालटलं आहे. असाच प्रकार न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात घडला. जडेजाचा हा कॅच पाहून सर्वांना धक्का बसला. जडेजाने हवेत उडी घेत नेइल वॅगनरला बाद केले. भारतसाठी विकेट फार महत्त्वाची होती. मात्र जडेजाच्या या कॅचनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे 6 वर्षांपूर्वीचे एक ट्वीट व्हायरल होत आहे. याआधी, सहा वर्षांपूर्वी एप्रिल 2013मध्ये धोनीने जडेजाच्या क्षेत्ररक्षणाविषयी ट्वीट केले होते. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की सर जडेजा झेल घेण्यासाठी धावत नाही, तर चेंडू त्याच्याकडे येतो. रविवारी न्यूझीलंडच्याविरुद्धही असाच प्रकार घडला. वाचा- विमान नाही, पक्षी नाही; हा तर फ्लाइंग जडेजा! कॅचचा अफलातून VIDEO
Sir Unbelievable Ravindra Jadeja #NZvsIND #INDvsNZ #INDvsNZTestCricket #NZvIND #jadeja #ViratKohli #Cricket https://t.co/S7BeICVBRN
— The Adventurous Bunny🏔 (@mountains_peace) March 1, 2020
वाचा- ‘आई नसती तर मी कधीच क्रिकेटपटू झालो नसतो’, रहाणेनं सांगितला संघर्षमय प्रवास जडेजाने हवेत उडी घेत, जबरदस्त कॅच पकडला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र त्यानंतर आता धोनीचे हे ट्वीट व्हायरल होत आहे.
वाचा- श्रेयस अय्यरला मोठा झटका, दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा गोलंदाज खेळणार नाही IPL हवेत उडी मारत घेतला झेल जडेजाचा हा संस्मरणीय झेल 72 व्या षटकात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात क्राइस्टचर्च येथे खेळल्या जाणार्या सामन्याच्या दुसर्या दिवशी पाहायला मिळाला. मोहम्मद शमी 72व्या षटकात गोलंदाजीसाठी आला. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर नेइल वॅगनरने स्क्वेअर लेगमध्ये खूपच उंच शॉट खेळला. ज्यावर झेल अशक्य आहे असे वाटत होते, मात्र जडेजाने हवेत उडी मारत सहज कॅच घेतला. जडेजाच्या या झेलवर खुद्द वॅगनरला विश्वास बसला नाही. वॅगनरने 41 चेंडूंत 21 धावा करून जेमीसनबरोबर चांगली भागीदारी केली होती. मात्र जडेजाने यांची चांगली भागीदारी मोडली.

)







