ऑकलंड, 25 नोव्हेंबर: भारत आणि न्यूझीलंड संघात आज तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होत आहे. टी20 मालिकाविजयानंतर भारतीय संघ वन डेतही तोच फॉर्म कारम राखण्यासाठी सज्ज झाला आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया यजमान न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. मालिकेतला पहिला सामना आज ऑकलंडमध्ये खेळवण्यात येत आहे. दरम्यान सामन्याआधी झालेल्या नाणेफेकीत न्यूझीलंड नं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारताकडून अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक वन डे पदार्पण करणार आहेत.
🚨 Team News 🚨@arshdeepsinghh & @umran_malik_01 make their ODI debuts.
— BCCI (@BCCI) November 25, 2022
Follow the match 👉 https://t.co/jmCUSLdeFf #TeamIndia | #NZvIND
A look at our Playing XI for the 1⃣st ODI 🔽 pic.twitter.com/3UGiESDHxD
ऑकलंडमध्ये 19 वर्षांपासून पराभव दरम्यान ऑकलंडमध्ये भारतीय संघाचं रेकॉर्ड तितकंसं खास नाही. ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानात 2003 साली म्हणजेच जवळपास 19 वर्षांपूर्वी भारतानं आपला शेवटचा वन डे सामना जिंकला होता. तेव्हापासून भारतीय संघाला या मैदानात एकही ंवन डे मॅच जिंकता आलेली नाही. पण धवनची टीम आज ऑकलंडमध्ये तो रेकॉर्ड मोडणार का याचीच उत्सुकता आहे. हेही वाचा - FIFA WC 2022: रोनाल्डोसारखा कोणी नाही! कतारमध्ये ‘द ग्रेट रोनाल्डो’नं लिहिला ‘हा’ नवा इतिहास अर्शदीप-उमरान मलिकला संधी धवननं आज दोन भारतीय खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक हे युवा खेळाडू आज भारताकडून वन डे पदार्पण करणार आहेत. अर्शदीपनं गेल्या काही महिन्यात टी20 क्रिकेटमध्ये चांगलं योगदान दिलं आहे. तर उमरान मलिक डोमेस्टिक क्रिकेट गाजवून आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.
Moment to cherish! 😊
— BCCI (@BCCI) November 25, 2022
Congratulations to @arshdeepsinghh and @umran_malik_01 as they are set to make their ODI debuts 👏 👏#TeamIndia | #NZvIND pic.twitter.com/VqgTxaDbKm
ऑकलंडमध्ये कसा आहे हवामानाचा मूड? स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑकलंडमध्ये आज हवामान स्वच्छ असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सामन्याचा पूर्ण आनंद लुटता येणार आहे. टी20 मालिकेदरम्यान चाहत्यांची चांगलीच निराशा झाली होती. पण वन डेत मात्र पूर्ण ओव्हर्सचा खेळ अपेक्षित आहे.