दोहा-कतार, 24 नोव्हेंबर: पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा फुटबॉल विश्वातला सध्याचा अव्वल खेळाडू म्हणून ओळखला जातो. अवघ्या जगात रोनाल्डो लोकप्रियतेच्या बाबतीतही शिखरावर आहे. रोनाल्डोच्या मैदानातल्या कामगिरीनंच त्याला आजवरचा सर्वश्रेष्ठ फुटबॉलर बनवलं आहे. यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्येही त्यानं पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. त्यामुळे त्याच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला गेला आहे. पोर्तुलागनं घानाचा 3-2 असा पराभव करुन यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी दिली. या सामन्यात पोर्तुगालचं खातं खोललं ते रोनाल्डोनंच. रोनाल्डोचा ऐतिहासिक गोल घानाविरुद्धच्या सामन्यात पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत राहिला. पण दुसऱ्या हाफमध्ये 65 व्या मिनिटाला रोनाल्डोनं पोर्तुगालचं खातं खोललं. पेनल्टी किकवर त्यानं पहिल्या गोलची नोंद केली. याच कामगिरीसह पाचही वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा तो जगातला पहिला फुटबॉलर ठरला. 2006 पासून वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत रोनाल्डोनं आठ गोल केले आहेत. महत्वाचं म्हणजे वर्ल्ड कपमध्ये त्यानं गोल केलेला एकही सामना पोर्तुगालनं गमावलेला नाही.
Cristiano Ronaldo never missed the penalty in FIFA World Cup 5 times in a row…. Portugal vs Ghana 1st goal#PORGHA #Portugal #portugalghana #CR7𓃵 #Ronaldo #penalty #FIFAWorldCup #FIFA22 #FIFAWorldCuplive pic.twitter.com/mI7MBcZn3r
— Nafees Ur Rehman (@nafee5_sial) November 24, 2022
हेही वाचा - FIFA WC 2022: जपाननं फक्त मॅच नाही तर मनंही जिंकली… जगाला दिला ‘हा’ महत्वाचा संदेश, पाहा Video रोनाल्डोचे वर्ल्ड कप गोल 1 - वि. इराण (2006) 2- वि. उत्तर कोरिया (2010) 3- वि. घाना (2014) 4- वि. स्पेन (2018) पेनल्टी 5- वि. स्पेन (2018) 6- वि. स्पेन (2018) 7- वि. मोरोक्को (2018) 8- वि. घाना (2022)