IND vs NZ : 30 वर्षांनंतर टीम इंडियावर ओढावणार नामुष्की? कॅप्टन कोहलीचे सगळे प्लॅन फेल

IND vs NZ : 30 वर्षांनंतर टीम इंडियावर ओढावणार नामुष्की? कॅप्टन कोहलीचे सगळे प्लॅन फेल

भारत-न्यूझीलंड यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना होत आहे. याआधी भारतानं 2-0ने ही मालिका गमावली आहे.

  • Share this:

माऊंट माउंगानुई, 11 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना होत आहे. याआधी भारतानं 2-0ने ही मालिका गमावली आहे. मात्र क्लीन स्वीपची नामुष्की टाळण्यासाठी भारताला हा सामना जिंकावा लागणार आहे. मात्र असे न झाल्यास विराटच्या नावावर एका लाजीरवाणी विक्रमाची नोंद होईल.

न्यूझीलंडविरुद्धच्या सध्याच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ 2-0 ने पिछाडीवर आहे. न्यूझीलंडने तिसरा सामनाही जिंकल्यास 1990नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा भारतीय संघाला वनडे मालिकेत क्लीन स्वीपचा सामना करावा लागणार आहे. 30 वर्षांपूर्वी टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 5-0 असा पराभव पत्करावा लागला होता. 2006मध्ये दक्षिण आफ्रिकेनेही भारताकडून 4-0 एकदिवसीय मालिका गमावली होती, परंतु त्यानंतर पावसामुळे पहिला वनडे सामना रद्द झाला होता.

वाचा-अरे पृथ्वी शॉने काय केलं? स्वत:च्या पायावर मारली कुऱ्हाड आणि संघाला टाकलं अडचणीत

संघाला भासतेय रोहितची कमी

पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी गेल्या दोन सामन्यात चांगली कामगिरी केली असली तरी संघाला ती मजबूत सुरुवात देऊ शकली नाही. रोहितच्या अभावामुळे भारताला चांगलेच अडचणीत टाकले आहे. रोहितने गेल्या 12 महिन्यांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 57.30 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याच्या अनुपस्थितीत, धावा करण्याचा संपूर्ण संघ कोहलीवर आला, त्याने दोन सामन्यात 66 धावा केल्या. श्रेयस अय्यरने शतक व अर्धशतक ठोकले परंतु रॉस टेलरने दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघावर वर्चस्व राखले. अय्यरने चांगली कामगिरी केली म्हणून फिनिशरची भूमिका साकारू शकले नाही.

वाचा-अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला नाही पण टीम इंडियाला मिळाले भविष्यातले 5 स्टार खेळाडू

विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय

टी-20 मालिकात चांगली कामगिरी करणाऱ्या विराटला एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली गेल्या काही सामन्यात सतत बोल्ड आऊट होत आहे. या सामन्यात मात्र विराट झेलबाद झाला. त्याला केवळ 9 धावा करता आल्या. ऑकलंडमधील दुसऱ्या सामन्यात कोहलीला टीम साऊदीने बोल्ड केले होते. आपल्या 12 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच विराटवर अशी नामुष्की ओढावली आहे.

वाचा-भारतीय खेळाडूंना मारण्यासाठी बॅट घेऊन मैदानात आला होता बांगलादेशी खेळाडू आणि...

टीम इंडिया- पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, के.एल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर,नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह

न्यूजीलंडचा संघ- मार्टिन गुप्टिल, हेनरी निकोल्स, केन विल्यम्सन, रॉस टेलक, टॉम लाथम, जेम्स नीशम, कॉलिन डी ग्रॅंडहोम, मिचेल सेंटनर, टिम साउदी, कयेले जेमीसन, हामिश बेनेट

First published: February 11, 2020, 9:49 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading