अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशने अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून इतिहास रचला. भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकता आला नसला तरी यातून सिनियर संघासाठी काही स्टार खेळाडू मिळाले आहेत.
अंडर 19 टीम इंडियाच्या फलंदाजीची धुरा जयस्वालने यशस्वीपणे पेलली. त्याने सहा डावात मिळून 400 धावा केल्या. यात एका शतकाचा आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटने गौरवण्यात आलं.
टीम इंडियाची गोलंदाजी सांभाळली ती रवि बिश्नोईने. त्याने मालिकेत सर्वाधिक 17 गडी बाद केले. त्यानं धावा देताना कंजूषपणा केला. फक्त 3.48 च्या इकॉनॉमी रेटने बिश्नोईने धावा दिल्या. अंतिम सामन्यात त्यानं 4 गडी बाद केले मात्र इतर गोलंदाजांची साथ मिळाली नाही.
भारताच्या कार्तिक त्यागीने भेदक गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना धडकी भरवली. त्यानं 3.45 च्या इकॉनॉमी रेटने 6 सामन्यात 153 धावा देत 11 गडी बाद केले.
अथर्वसारखाच दिव्यांश सक्सेनाचीसुद्धा चर्चा रंगली आहे. त्यानं फलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही कमाल केली. दिव्यांशने 5 डावात 50 च्या सरासरीने 150 धावा केल्या.
अथर्व अंकोलेकर अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढे येऊ शकतो. लोअर ऑर्डमध्ये फलंदाजी करणाऱा अथर्व गोलंदाजीतही कमाल करतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद अर्धशतकी खेळी करत त्याने भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारू दिली.