मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ : ही कसली कॅप्टन्सी? फॉर्ममधल्या खेळाडूंनाच विराटनं न्यूझीलंडविरुद्ध दिली नाही जागा

IND vs NZ : ही कसली कॅप्टन्सी? फॉर्ममधल्या खेळाडूंनाच विराटनं न्यूझीलंडविरुद्ध दिली नाही जागा

भारत-न्यूझीलंड यांच्यात 29 फेब्रुवारीपासून क्राइस्टचर्च येथे दुसऱ्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या सामन्यात संघात बदल होऊ शकतात.

भारत-न्यूझीलंड यांच्यात 29 फेब्रुवारीपासून क्राइस्टचर्च येथे दुसऱ्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या सामन्यात संघात बदल होऊ शकतात.

भारत-न्यूझीलंड यांच्यात 29 फेब्रुवारीपासून क्राइस्टचर्च येथे दुसऱ्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या सामन्यात संघात बदल होऊ शकतात.

  • Published by:  Priyanka Gawde

वेलिंग्टन, 25 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव सहन करावा लागला. यामुळं टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताला पहिला झटका मिळाला. या सामन्यामुळं भारताच्या सलामी जोडीची आणि मधल्या फळीच्या फ्लॉप खेळीची पोलखोल झाली. पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल फेल झाल्यानंतर मधल्या फळीलाही चांगली फलंदाजी करता आली नाही.

पहिल्या डावात पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवालनं 16 धावांची भागीदारी केली तर दुसऱ्या डावात 27 धावांची. एकदिवसीय मालिकेप्रमाणे कसोटीमध्येही मयंक आणि पृथ्वी शॉ यांची जोडी चांगली कामगिरी करू शकली नाही. पहिल्या डावात या दोघांनी 16 धावांची भागीदारी केली तर दुसऱ्या डावात 27 धावांची. दुसऱ्या डावात मयंकने अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र शॉला चांगली कामगिरी करता आली नाही.

वाचा-केएल राहुलला मिळाली संघात जागा, मालिका जिंकण्यासाठी घेतला मोठा निर्णय

पृथ्वी शॉ झाला फ्लॉप

सलामीची जोडी फेल झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीवर दबाव आला. पृथ्वी शॉविषयी बोलताना, 29 फेब्रुवारीपासून क्राइस्टचर्च येथे होणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यात त्याला स्थान मिळणे कठिण आहे. पृथ्वी शॉने वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्या डावात 16 धावा केल्या तर दुसर्‍या डावात तो 14 धावांवर बाद झाला.

वाचा-कसोटी वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला पराभव, गुणतालिकेत झाले मोठे बदल

गीलला मिळू शकते संधी

दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्च येथे आहे जेथे गेल्या महिन्यात न्यूझीलंड ए विरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात शुभमन गिलने दुहेरी शतक झळकावले होते. या सामन्याच्या पहिल्या डावात शुभमन गिलने 83 धावा केल्या, तर दुसर्‍या डावात त्याने नाबाद 204 धावा केल्या. तरी गीलला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळाली नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली अशी अपेक्षा आहे.

केएल राहुलला कसोटी मालिकेतच मिळाली नाही जागा

न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत राहुलनं शानदार कामगिरी केली होती. एकदिवसीय मालिकेत केएलनं 102च्या सरासरीनं 3 सामन्यात 204 धावा केल्या, यात एका अर्धशतकाचा समावेश होता. तर, टी-20 मालिकेत राहुलला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्यानं 5 सामन्यात 56च्या सरासरीनं 224 धावा केल्या, यात 2 अर्धशतकांचा समावेश होता. असे असूनही राहुलला कसोटी संघात जागा मिळाली नाही. त्यानंतर विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

वाचा-विराटपासून अश्विनपर्यंत सर्व झाले फेल! ही आहेत भारताच्या पराभवाची प्रमुख 5 कारणे

ऋद्धीमान साहाला संधी का नाही?

एकदिवसीय, टी-20 किंवा कसोटी एकाही फॉर्मेटमध्ये ऋषभ पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात पंत रहाणेमुळं धावबाद झाला. मात्र त्याला विशेष चांगली खेळी करता आली नाही. त्यामुळं ऋद्धीमान साहाला विराटनं संधी का दिली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

First published:

Tags: Cricket, India vs new Zealand, Virat kohli