वेलिंग्टन, 21 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना (IND vs NZ 1st Test) वेलिंग्टनच्या बेसिन रिसर्व मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या आघाडीच्या आणि मधल्या फळीला चांगली कामगिरी करता आली नाही. पावसामुळं पहिला दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. पहिल्या दिवशी भारतानं 122-5 पर्यंत मजल मारली. अजिंक्य रहाणे (38) आणि ऋषभ पंत (10) धावांवर खेळत आहेत. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला चांगली कामगिरी करता आली नाही. कोहली 2 धावा करत बाद झाला. त्याआधी पृथ्वी शॉ (18 चेंडूत 16 धावा), चेतेश्वर पुजारा (42 चेंडूत 11 धावा) यांनी खेळपट्टीवर जास्त काळ टिकता आले नाही. दरम्यान कोहली मोठी खेळी करेल असे वाटत होते, मात्र पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या काइल जॅमीसनने (Kyle Jamieson) विराटला बाद केले. सध्या सोशल मीडियावर विराट बाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वाचा- विराटला झालंय काय? पहिल्याच कसोटी सामन्यात केला लाजीरवाणा रेकॉर्ड
One of those typical Virat Kohli's UNWANTED way of getting OUT. #NZvIND pic.twitter.com/AKN9Ef01f9
— Doshant Girdhar (@Doshantgirdhar) February 21, 2020
वाचा- ‘कोहलीला 20 कोटी मिळतात म्हणून चांगला खेळतो नाहीतर…’ विराट कोहलीनं काइलच्या खेळपट्टीच्या बाहेर जात असलेल्या चेंडूवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बॅटच्या कडेला लागून स्लिपमध्ये गेली. यावेळी स्लिपमध्ये उभ्या असलेल्या अनुभवी रॉस टेलरने काहीही चूक न करता ही कॅच घेतली. मात्र टेलरनं कॅच हाताने नाही तर चक्क पोटानं पकडला असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. टेलरच्या हातानं सुटलेला चेंडू त्यानं पटकन पोटात पकडला. कोहलीची मोठी विकेट मिळाल्यानंतर न्यूझीलंडनं जोरदार सेलिब्रेशन केले. वाचा- पावसाने फेरले पहिल्या दिवसावर पाणी, अजिंक्यच्या एकहाती खेळीने भारताला वाचवलं विराटच्या नावावर लाजीरवाणा रेकॉर्ड विराट कोहलीनं निराशाजनक कामगिरी केली असली, तरी असं करणारा तो पहिला कर्णधार नाही आहे. याआधी माजी कर्णधार सौरव गांगुली आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात केवळ 2 धावा करत बाद झाला. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात याआधी कर्णधार म्हणून नवाब पटौडी यांनी 11, सुनील गावस्कर नाबाद 35, बिशन सिंग बेदी 30 धावा, मोहम्मद अझहरुद्दीन 30 आणि विरेंद्र सेहवाग 22 धावा केल्या आहेत.

)







