वेलिंग्टन, 23 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सध्या तिसऱ्या दिवसात पोहचला आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव 348 धावांत संपला. त्यामुळं न्यूझीलंड संघाला तब्बल 183 धावांची आघाडी मिळाली आहे. भारताकडून इशांत शर्माने 5, अश्विनने 3 तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतानं तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या. मात्र तळाच्या फलंदाजांना बाद करणे भारताला जमले नाही. त्यामुळं जॅमीसन आणि ट्रेंट बोल्ट यांनी विजयी आघाडी मिळवली. दरम्यान भारतीय संघाने गेल्या सात सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र वेलिंग्टनमध्ये होणाऱ्या सामन्यात भारतावर पराभवाची टांगती तलवार आहे. भारताचा पहिला डावा 165 डावांवर संपुष्टात आला. भारताकडून अजिंक्य रहाणेनं सर्वाधिक 46 धावा केल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यम्सननं महत्त्वपूर्ण 89 धावांची खेळी. केन आणि रॉस टेलर (44) यांच्यात चांगली भागीदारी केली. त्यांनतर ग्रॅंडहोमनं 44 तर तळाचे फलंदाज जॅमीसन (44) आणि ट्रेंट बोल्ट (38) यांनी शतकी भागीदारी केली. दरम्यान भारताच्या दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ 14 धावांवर बाद झाला. तर चेतेश्वर पुजाराला बोल्टनं 11 धावांवर बोल्ड केले. मयंक अग्रवालनं अर्धशतकी खेळी करत सध्या मैदानावर भारताचा पराभव टाळण्याचा प्रयत्न करत आहे. वाचा- फॉर्ममध्ये नाही तरी कोहलीनं रचला अनोखा विक्रम, सचिनच्या पंगतीत मिळवलं स्थान
Pujara falls at the stroke of Tea on Day 3.#TeamIndia 165 & 78/2, trail New Zealand (348)by 105 runs.
— BCCI (@BCCI) February 23, 2020
Scorecard - https://t.co/tW3NpQIHJT #NZvIND pic.twitter.com/dMvBvnh6bz
वाचा- रहाणेच्या चुकीनंतर इशांतनं इंडियाला तारलं, न्यूझीलंडकडे 51 धावांची आघाडी 20 वर्षांपूर्वी याच परिस्थितीत भारताने जिंकला होता सामना न्यूझीलंडची 183 धावांची आघाडी भारतासाठी मोठी असू शकते. त्यामुळं भारत पराभवाच्या वाटेवर वाटत असला तरी, याआधी भारतानं या परिस्थितीवर मात देत विजय मिळवला होता. 20 वर्षांपूर्वी असा प्रकार घडला होता. 2000मध्ये कोलकाता येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारत पहिल्या डावात 274 धावांनी पिछाडीवर होता, परंतु असे असूनही सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने हा सामना जिंकला. याआधी पहिल्यांदा 1976मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने 131 धावांनी पिछाडीवर असतानाही विजय मिळविला होता. वाचा- विराटसाठी धोक्याची घंटा! 91 दिवस, 19 डावांआधी लगावले होते शतक भारतीय फलंदाज वेगवान गोलंदाजांसमोर झाले ढेर पहिल्या दिवशी पाच विकेट गमावल्यानंतर 122 धावा करणारा भारतीय संघ दुसर्याच दिवशी पहिल्या सत्रातच बाद झाला. रहाणे व पंत यांनी डावा पुढे नेणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. रहाणेच्या एका चुकीमुळे पंत बाद झाला. त्यामुळं भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंत बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या आर अश्विनला खाते न उघडता टीम साऊथीने बोल्ड केले. अश्विननंतर रहाणेही टीम साऊथीचा बळी ठरला, त्याच्या चेंडूवर यष्टीरक्षक वॅटलिंगने पकडला आणि अर्धशतक चुकले.

)







