वेलिंग्टन, 22 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही न्यूझीलंडने भारतावर वर्चस्व राखत 51 धावांची आघाडी मिळवली आहे. पहिल्या डावात भारताला केवळ 165 धावा करता आल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यम्सननं महत्त्वपूर्ण 89 धावांची खेळी. केन आणि रॉस टेलर (44) यांच्यात चांगली भागीदारी झाली. त्यामुळं न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशी अर्धशतकी आघाडी घेतली. दरम्यान विराट कोहलीची बॅट तळपली नसली तरी, गोलंदाजीमध्ये त्यानं एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
दुसऱ्या दिवसाच्या खेळात, विराट कोहलीने दिग्गज भारतीय खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने स्लिपमध्ये हेन्री निकोल्सचा झेल पकडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला कोहलीचा हा 250वा झेल ठरला. यासह विराट कोहलीने अझरुद्दीन-द्रविड आणि सचिन यांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. मात्र विराटला फलंदाजीमध्ये या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या डावात विराट केवळ 2 धावा करत बाद झाला.
वाचा-विराटसाठी धोक्याची घंटा! 91 दिवस, 19 डावांआधी लगावले होते शतक
Virat Kohli became 4th Indian fielder after Azharuddin, Dravid, Sachin to complete 250 catches in intl cricket#NZvsIND
— CricBeat (@Cric_beat) February 22, 2020
वाचा-रहाणेच्या चुकीनंतर इशांतनं इंडियाला तारलं, न्यूझीलंडकडे 51 धावांची आघाडी
विराटसाठी धोक्याची घंटा
दरम्यान या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला केवळ 2 धावा काढता आल्या. त्यामुळं विराटचा फॉर्म हा भारतीय संघासाठी धोक्याची घंटा आहे. विराटनं 19 डावांत (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20) एकही शतक लगावलेले नाही. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या डावात विराटनं केवळ 7 चेंडूंचा सामना केला आणि तो बाद झाला. विराटनं अखेरचे शतक बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबरमध्ये लगावले होते. म्हणजे तब्बल 91 दिवस झाल्यानंतरही त्याने शतक लगावलेले नाही.
वाचा-LIVE सामन्यातच खेळाडू करत होते फिक्सिंग? व्हायरल फोटोनं खळबळ
कोहली 2011मध्ये 24 डावांत एकही शतक लगावले नव्हते
कोहलीचा खराब फॉर्म फेब्रुवारी 2011पासून डिसेंबर 2011 खराब फॉर्ममध्ये होता. त्यावेळी 24 डावांत कोहलीने एकही शतक लगावले नव्हते. कोहलीनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 70 शतक लगावले आहेत. यात 84 कसोटी सामन्यात 27 आणि 248 एकदिवसीय सामन्यात 43 शतक लगावले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Virat kohli