Home /News /sport /

IND vs NZ Day 2 : रहाणेच्या चुकीनंतर इशांत शर्मानं इंडियाला तारलं, न्यूझीलंडकडे 51 धावांची आघाडी

IND vs NZ Day 2 : रहाणेच्या चुकीनंतर इशांत शर्मानं इंडियाला तारलं, न्यूझीलंडकडे 51 धावांची आघाडी

न्यूझीलंडनं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 216 धावांपर्यंत मजल मारत 51 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून इशांत शर्मानं 3 विकेट घेत डाव सावरला.

    वेलिग्टन, 22 फेब्रुवारी : भारत-न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथे पहिला कसोटी सामना होत आहे. या सामन्यात भारताचा पहिला डावा 165 डावांवर संपुष्टात आला. भारताकडून अजिंक्य रहाणेनं सर्वाधिक 46 धावा केल्या. पहिल्या दिवशी 122 धावांवर संपलेल्या खेळानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला केवळ 43 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या न्यूझीलंडनं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 216 धावांपर्यंत मजल मारत 51 धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून इशांत शर्मानं 3 विकेट घेत डाव सावरला. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विल्यम्सननं महत्त्वपूर्ण 89 धावांची खेळी. केन आणि रॉस टेलर (44) यांच्यात चांगली भागीदारी झाली. त्यामुळं न्यूझीलंडला आघाडी घेण्याची संधी मिळाली. पहिला दिवसाचा खेळ पावसामुळं संपल्यानंतर भारताला कमबॅक करता आला नाही. इशांत शर्मानं टॉम लेथम आणि टॉम ब्लंडेल या सलामीवीरांना माघारी धाडले. त्यानंतर शर्मानं केन आणि टेलर यांची भागीदारी मोडत टेलरला बाद केले. भारतीय फलंदाज वेगवान गोलंदाजांसमोर झाले ढेर पहिल्या दिवशी पाच विकेट गमावल्यानंतर 122 धावा करणारा भारतीय संघ दुसर्‍याच दिवशी पहिल्या सत्रातच बाद झाला. रहाणे व पंत यांनी डावा पुढे नेणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. रहाणेच्या एका चुकीमुळे पंत बाद झाला. त्यामुळं भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पंत बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या आर अश्विनला खाते न उघडता टीम साऊथीने बोल्ड केले. अश्विननंतर रहाणेही टीम साऊथीचा बळी ठरला, त्याच्या चेंडूवर यष्टीरक्षक वॅटलिंगने पकडला आणि अर्धशतक चुकले. विराटसाठी धोक्याची घंटा दरम्यान या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला केवळ 2 धावा काढता आल्या. त्यामुळं विराटचा फॉर्म हा भारतीय संघासाठी धोक्याची घंटा आहे. विराटनं 19 डावांत (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20) एकही शतक लगावलेले नाही. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या डावात विराटनं केवळ 7 चेंडूंचा सामना केला आणि तो बाद झाला. विराटनं अखेरचे शतक बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबरमध्ये लगावले होते. म्हणजे तब्बल 91 दिवस झाल्यानंतरही त्याने शतक लगावलेले नाही.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या