अजिंक्य रहाणेला पडतायत 'गुलाबी' स्वप्न, विराट-शिखर म्हणाले...

अजिंक्य रहाणेला पडतायत 'गुलाबी' स्वप्न, विराट-शिखर म्हणाले...

भारत-बांगलादेश यांच्यात 22 नोव्हेंबरला ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना होणार आहे.

  • Share this:

कोलकाता, 19 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात 22 नोव्हेंबरला ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामना होणार आहे. पहिल्यांदाच भारतात असा सामना खेळला जाणार आहे. इडन गार्डन्स येथे हा कसोटी सामना होणार असून गुलाबी चेंडूत हा सामना खेळवण्यात येईल. भारताचा हा 540वा कसोटी सामना असणार आहे. या सामन्यासाठी चाहते सर्वात जास्त उत्सुक आहेत. दरम्यान, पहिला कसोटी सामना भारतानं 130 धावांनी जिंकला होता. सध्या भारतीय संघ डे-नाईट सामन्याची तयारी करत आहे.

डे-नाइट सामन्याला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत असतील तरी, भारताचा कसोटी स्पेशालिस्ट अजिंक्य रहाणे सध्या गुलाबी स्वप्नात आहे. अजिंक्य रहाणेनं आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये रहाणे गुलाबी चेंडूशेजारी ठेऊन झोपला होता. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 22-26 नोव्हेंबर दरम्यान भारत-बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. याआधी भारतीय संघ गुलाबी चेंडूसह सराव करत आहे.

वाचा-राष्ट्रपती राजवटीचं इंग्लंड कनेक्शन, 'या' क्रिकेटपटूनं 2014मध्ये केलं होतं भाकित

 

View this post on Instagram

 

Already dreaming about the historic pink ball test 😊

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

अजिंक्य रहाणेनं शेअर केलेल्या फोटोवर कर्णधार विराट कोहली आणि शिखर धवन यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. अजिंक्य रहाणेनं फोटो शेअर करत, “ऐतिहासिक गुलाबी चेंडू आता स्वप्नातही येत आहे”, असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर विराट कोहलीनं, मस्त पोज जिंक्सी असा रिप्लाय दिला तर शिखरनं, स्वप्नात कोणी फोटो काढला असा मजेशीर सवाल केला.

वाचा-हा तर 'सुपरमॅन', एका क्षणात उडाला हवेत आणि..., पाहा अफलातून कॅचचा VIDEO

असा असेल डे-नाईट सामना

नोव्हेंबरमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या गुलाबी पर्वाची सुरुवात इडन गार्डन्स मैदानावरून होणार आहे. आगामी भारतीय दौऱ्यावर बांगलादेशचा संघ (Bangladesh Cricket Team) इडन गार्डन्स (Eden Gardens)मैदानावर डे/नाईट कसोटी सामना खेळणार आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(BCCI)ने दिलेल्या प्रस्तावाला बांगलादेश क्रिकेट बोर्डा(Bangldesh Cricket Board)ने हिरवा कंदील दाखवला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये डे/नाईट कसोटीला आधीच सुरुवात झाली आहे. पण भारतात हा पहिलाच अशा प्रकारचा सामना होत आहे.

वाचा-धोनीला रिलीज करणार का? सूत्रांच्या माहितीवर CSK ने दिलं ऑफिशिअल उत्तर

डे-नाईट सामन्याचे नियम

पारंपारिक कसोटी सामने हे लाल चेंडूवर खेळले जात असले तरी दिवस-रात्र कसोटी सामन्यांमध्ये वापरला जाणारा चेंडू मात्र गुलाबी रंगाचा असतो. रात्री प्रकाशझोतात चेंडू पटकन दिसावा म्हणून हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत कुकाबुरा या कंपनीचेच गुलाबी चेंडू वापरले गेले आहेत. इतर प्रथम श्रेणी क्रिकेट प्रमाणेच डे-नाईट टेस्टमध्ये 80 षटकानंतर नवा चेंडू घेता येतो. डे- नाईट कसोटी सामन्यांमध्येसुध्दा दिवसाला सहा तास आणि 90 षटकांच्या खेळाचे नियोजन असते. यात फॉलोऑन नचा नियम डे- नाईट कसोटीसाठी मात्र वेगळा आहे. पारंपरिक कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर 200 धावांची आघाडी असली तर फॉलोऑन देता येता. दिवस -रात्र सामन्यात हीच आघाडी 150 धावांची असली तरी फॉलोऑन देता येतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2019 02:59 PM IST

ताज्या बातम्या